मेस्सी-रोनाल्डोच्या चाहत्यांमधील मेस्सी श्रेष्ठ की रोनाल्डो हे शितयुद्ध जगजाहीर आहे. सध्या रशियामध्ये फिफा विश्वचषक सुरू असल्याने मेस्सी-रोनाल्डो या वादाला आणखी जोर चढला आहे.
रशियातील 2018 च्या फुटबाल विश्वचषकात मेस्सीच्या अर्जेंटीना आणि रोनाल्डोच्या पोर्तूगाल संघाचे आव्हान बाद फेरीतच संपुष्टात आले.
मात्र स्पर्धेबाहेर जाता-जाता मेस्सी-रोनाल्डो वाद एका रशियन दांपत्याचा संसार मोडून गेले.
2002 च्या फिफा विश्वचषकावेळी एका बारमध्ये ओळख झालेल्या आर्सन आणि ल्युडमिला दोघांनाही फुटबॉलबद्दल प्रचंड आकर्षण असल्यामुळे पुढे त्यांनी विवाह केला होता.
रशियातील या फुटबॉलवेड्या दांपत्याचा मेस्सी-रोनाल्डो वादामुळे चक्क घटस्फोट घेत आपला संसार मोडला.
एका रशियन वृत्तपत्रानुसार आर्सन आणि ल्युडमिला हे दापंत्य प्रचंड फुटबॉल वेडे आहे. यातील आर्सन हा अर्जेंटीनाच्या मेस्सीचा चाहता तर ल्युडमिला ही पोर्तूगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोची चाहती.
फिफा विश्वचषकाच्या अर्जेंटीनाने गट फेरीच्या शेवटच्या सामन्यात अर्जेंटीनाने विजय मिळवल्यानंतर आर्सनने सेलिब्रेशन केले. त्यावर ल्युडमिला सतत आर्सनला पटवून द्यायला लागली की रोनाल्डो कसा भारी आहे. मेस्सीला आइसलॅंड विरुद्ध पेनल्टी किकवर कसा गोल करता आला नाही.
यावरुन वैतागलेल्या आर्सनने आपली बॅग पॅक करून घर सोडून गेला आहे. तसेच त्याने त्याच्या बायकोला घटस्फोटाची नोटीसही पाठवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-फिफा विश्वचषकातून बाहेर पडल्याने खेळाडूचा करण्यात आला होता…
-फिफा विश्वचषकातील अचूक निकाल सांगणाऱ्या ऑक्टोपसचे केले तुकडे