आयपीएल 2024 मध्ये राजस्थान रॉयल्सचा संघ चांगली कामगिरी करत असून स्पर्धेत अद्याप त्यांचा एकदाही पराभव झालेला नाही. त्यांनी आतापर्यंत 4 सामन्यांत 4 विजय मिळवले आहेत. सध्या रॉयल्स आयपीएल 2024 च्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. दुसरीकडे युवा कर्णधार शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळताना गुजरात टायटन्सनं 5 सामन्यांत 2 विजय मिळवले आहेत, तर 3 सामन्यांत त्यांचा पराभव झाला आहे. हे दोन्ही संघ आज (10 एप्रिल) जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर आमनेसामने येणार आहेत.
डेव्हिड मिलर दुखापतीमुळे मागील काही सामने खेळू शकला नाही. त्यामुळे गुजरातच्या मधल्या फळीत कमकुवतपणा जाणवत होता. अशातचं जर आता शुबमन गिलला पराभवाची हॅट्रिक होऊ द्यायची नसेल तर तो प्लेइंग 11 मध्ये बदल करु शकतो. आज होणाऱ्या सामन्यात अभिनव मनोहर किंवा शाहरुख खान यांना संघात स्थान मिळू शकते. तर विजय शंकरला त्याच्या खराब कामगिरीमुळे बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.
दुसरीकडे, राजस्थान रॉयल्स आपल्या टीममध्ये कोणताही बदल करेल असं वाटत नाही. ते आपल्या आधीच्याच खेळाडूंसोबत मैदानात उतरतील. संदीप शर्मा दुखापतीमुळे मागील दोन सामन्यांत खेळू शकला नाही. दुखापत गंभीर असल्यामुळे तो आजच्या सामन्यातूनही बाहेर राहू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. रॉयल्स आपल्या खेळाडूंचा फॉर्म पाहता प्लेइंग 11 मध्ये कोणताही बदल करतील असं वाटत नाही.
राजस्थान रॉयल्स संघाची संभाव्य प्लेंइंग 11 – यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टीरक्षक), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरोन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर आणि युजवेंद्र चहल.
इम्पॅक्ट खेळाडू – शुभम दुबे
गुजरात टायटन्स संघाची संभाव्य प्लेइंग 11– शुबमन गिल (कर्णधार), रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, केन विल्यमसन/मॅथ्यू वेड, विजय शंकर, अभिनव मनोहर/शाहरुख खान, राहुल तेवतिया, राशिद खान, नूर अहमद, उमेश यादव आणि स्पेन्सर जॉन्सन.
इम्पॅक्ट खेळाडू – मोहित शर्मा
महत्त्वाच्या बातम्या
बापरे! ताशी 140 किमी वेगाच्या चेंडूवर यष्टीचीत केलं! हेनरिक क्लासेनची आश्चर्यकारक कामगिरी
मुलाला क्रिकेटर बनवण्यासाठी वडिलांनी केला सरकारी नोकरीचा त्याग! जाणून घ्या नितिश रेड्डीची कहानी
विश्वविजेत्या कर्णधारानं केलं अनकॅप्ड भारतीय खेळाडूचं कौतुक, पंजाबविरुद्ध एकहाती जिंकवला सामना