क्रिडा मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी माजी तिंरदाज अशोक सोरेनला पाच लाखाचा निधी मंजूर केला आहे. सोरेन हा त्याच्या उर्दनिर्वाहासाठी मजूर म्हणून काम करत होता.
हा निधी खेळाडूंसाठी असलेल्या पंडित दीनद्याल उपाध्याय राष्ट्रीय फंड यामधून दिला जातो. सोरेन याची स्थिती हलाखीची असून तो सध्या जमशेदपूर येथे राहत आहे. रोजगार हमी योजना अंतर्गत सोरेन हा दैनिक मजदूर म्हणून काम करत होता.
या २८ वर्षीय तिंरदाजाने २००८च्या एशियन गेम्समध्ये दोन सुवर्ण पदक पटकावले आहे.
याआधीही क्रिडा मंत्रालयाने अर्जुन पुरस्कार विजेता तिंरदाज लिंबा रामलाही निधी दिला आहे. तसेच या महिन्याच्या सुरूवातीला गोहेला बोरोलाही पाच लाख रूपयाचा निधी मंजूर केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–बीसीसीआयचा हा पराक्रम युसूफ पठाणमुळे हुकला
–स्वित्झर्लंड दुतावासाचा भारतीय सायक्लिंग संघाला व्हिसा देण्यास नकार
–मेसट ओझीलचे आरोप जर्मनी फुटबॉल महासंघाने फेटाळले