---Advertisement---

12 वर्षांनंतर श्रीसंत पुन्हा अडचणीत! स्पॉट फिक्सिंग नव्हे, ‘या’ कारणामुळे घातली 3 वर्षांची बंदी

On: शुक्रवार, मे 2, 2025 4:13 PM
---Advertisement---

भारताचा माजी क्रिकेटपटू एस. श्रीसंतवर (S. Sreesanth) 3 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. हे प्रकरण चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी संजू सॅमसनला (Sanju Samson) भारतीय संघात स्थान न देण्याशी संबंधित आहे. खरंतर, केरळ क्रिकेट असोसिएशनचे म्हणणे आहे की श्रीसंतने बोर्डावर बनावट आणि अपमानास्पद आरोप केले होते. श्रीसंत सध्या केरळ क्रिकेट लीगमध्ये कोल्लम एरीज संघाचा सह-मालक आहे, या प्रकरणात, श्रीसंतच्या संघाला कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली आहे. (30 एप्रिल) रोजी कोची येथे झालेल्या बोर्ड बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

श्रीसंतवर बंदी का घालण्यात आली?

श्रीसंत 2 वेळा भारताच्या विश्वचषक विजेत्या संघाचा भाग राहिला आहे. त्याने मल्याळम टेलिव्हिजन चॅनेलवरील चर्चेदरम्यान संजू सॅमसन आणि केरळ क्रिकेट असोसिएशनबद्दल वादग्रस्त टिप्पणी केली. केसीएने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की श्रीसंतला सॅमसनला पाठिंबा दिल्याबद्दल नाही तर केसीएविरुद्ध खोटी आणि अपमानास्पद विधाने केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे.

टीव्हीवरील चर्चेदरम्यान श्रीसंतने संजू सॅमसन आणि इतर क्रिकेटपटूंना पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आणि केसीएवरही आरोप केले. श्रीसंतच्या आरोपांवर प्रत्युत्तर म्हणून केसीएने आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणही उपस्थित केले. या प्रकरणात केसीएने श्रीसंत 3 वर्षांची बंदी घातली आहे. 12 वर्षांपूर्वी स्पॉट फिक्सिंग प्रकरणात श्रीसंतवर अनेक वर्षांची बंदी घालण्यात आली होती.

केरळ क्रिकेट असोसिएशनने सॅमसनला विजय हजारे ट्रॉफी संघातून वगळले तेव्हा एस. श्रीसंतने वादग्रस्त विधान केले होते. त्यावेळी असा अंदाज लावला जात होता की विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळू न शकल्यामुळे सॅमसनला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या भारतीय संघातूनही गमवावे लागले. सॅमसन 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळू शकला नसला तरी, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने फायनलमध्ये न्यूझीलंडचा 4 गडी राखून धुव्वा उडवून तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावण्यात यश मिळवले.

एस श्रीसंतची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द-

कसोटी क्रिकेट (Test Matches)
सामने: 27
विकेट्स: 87
विकेट्सची सरासरी: 37.59
स्ट्राईक रेट: 62.2
इकोनॉमी रेट: 3.62
बेस्ट बॉलिंग: 5/40

वनडे क्रिकेट (One Day Internationals)
सामने : 53
विकेट्स: 75
विकेट्सची सरासरी: 33.44
स्ट्राईक रेट: 33.0
इकोनॉमी रेट: 6.07
बेस्ट बॉलिंग: 6/55

टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट (T20 Internationals)
सामने: 10
विकेट्स: 7
विकेट्सची सरासरी: 41.14
स्ट्राईक रेट: 29.1
इकोनॉमी रेट: 8.47
बेस्ट बॉलिंग: 2/12

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---