जगातील एकमेव अधिकृत टी१० लीग असलेल्या अबुधाबी टी१० लीगचा पुढील हंगाम लवकरच सुरू होणार आहे. या हंगामासाठी सर्व फ्रेंचाईजींनी आपापले संघ बनवण्यास आणि प्रशिक्षकांचा शोध सुरू केलाय. त्याचाच एक भाग म्हणून बांगला टायगर्स संघाने भारताचा दोन वेळेचा विश्वचषक विजेता वेगवान गोलंदाज श्रीसंत याला आपल्या संघाचा मेंटर म्हणून घोषित केले. बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसन हा या संघाचे नेतृत्व करेल.
बांगला टायगर्सकडून मेंटर म्हणून श्रीसंतची अधिकृत घोषणा करण्यात आली. श्रीशांत २००७ टी२० व २०११ वनडे विश्वचषक जिंकलेल्या भारतीय संघाचा भाग होता. बांगला टायगर्सच्या संघात वेस्ट इंडिजचा एविन लुईस, न्यूझीलंडचा कॉलिन मुन्रो, पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीर आणि श्रीलंकेचा मथिशा पाथिराना यांसारख्या अनेक दिग्गजांचा समावेश आहे.
गेल्या वर्षीच्या स्पर्धेत बांगला टायगर्स संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता. याआधी संघाने मुख्य प्रशिक्षक म्हणून आफताब अहमद, प्रशिक्षक म्हणून रिचर्ड स्टोनियर, सहायक प्रशिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून नजमुल आबेदिन फहीम यांची नियुक्ती केली आहे. यासोबतच कुणाल मानेक यांना विश्लेषक म्हणून कायम ठेवण्यात आले आहे. संघाच्या अधिकाऱ्यांच्या मते, अष्टपैलू खेळाडू आणि बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनचा संघात समावेश करणे रोमांचक आहे, त्याच्या आगमनाने संघ अधिक मजबूत झाला आहे. आम्ही विजेतेपदाचे दावेदार असू असे देखील संघाचे मालक यासीन चौधरी यांनी म्हटले.
डेक्कन ग्लॅडिएटर्स स्टार, दिल्ली बुल्स, चेन्नई ब्रेव्ह्स, बांगला टायगर्स, नॉर्दर्न वॉरियर्स आणि टीम अबू धाबी हे संघ स्पर्धेत सहभागी होत असतात.
डेक्कन ग्लॅडिएटर्सने गेल्या हंगामात मात दिल्ली बुल्सचा ५६ धावांनी पराभव करून स्पर्धा जिंकली होती. यंदा २३ नोव्हेंबरपासून शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर या स्पर्धेला सुरुवात होईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शत्रू नव्हे प्रतिस्पर्धी! विराटच्या पुनरागमनासाठी आफ्रिदी करतोय प्रार्थना, व्हिडिओ जिंकेल मन
रोहित, लक्ष्मणसमोर मोठा प्रश्न! पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी हुड्डा आणि कार्तिक पैकी कोण होणार इन?
पाकिस्तानला दुखापतींचे ग्रहण, आफ्रिदीनंतर ‘हा’ वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल