भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना चांगलाच रंगात आला आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामन्यात तिसऱ्या दिवसानंतर ऑस्ट्रेलिया 173 धावांनी आघाडीवर आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी डेविड वॉर्नर याच्या विकेटनंतर मैदानात एक मजेशीर प्रसंग पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फलंदाज मार्नस लॅब्युशेन हा चक्क झोपलेला पाहायला मिळाला. मात्र, त्यानंतर त्याच्या या झोपण्यामागील कारणाचा खुलासा देखील झाला आहे.
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातील चौथ्या षटकात डेव्हिड वॉर्नर बाद झाला. त्याने या डावात 8 चेंडूत अवघी एक धाव करून मोहम्मद सिराजच्या चेंडूवर विकेट गमावली. वॉर्नर बाद झाल्यानंतर मार्नस लॅब्युशेन (Marnus Labuchagne) तात्काळ खेळपट्टीवर येणे अपेक्षित होते. मात्र, तिसऱ्या क्रमांकावर खेळणारा लॅब्युशेन त्यावेळी डगआऊटमध्ये निवांत झोपला होता. चाहत्यांच्या आवाजाने त्याला जाग आली व तो खेळण्यासाठी उतरू लागला. हा व्हिडिओत सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मात्र, तो अशाप्रकारे का झोपला होता याचा उलगडा भारताचा माजी वेगवान गोलंदाज श्रीसंत याने केला. तो म्हणाला,
“ऑस्ट्रेलिया संघासोबत प्रशिक्षक म्हणून केलेल्या श्रीधरन श्रीराम यांनी मला त्याच्या या सवयीबद्दल सांगितले होते. लॅब्युशेन याच सामन्यात नव्हे तर प्रत्येक वेळी फलंदाजी आधी अशाच प्रकारे झोपतो. खरंतर, तो झोपलेला नसतो आपण कशी फलंदाजी करणार याविषयी विचार त्याच्या डोळ्यासमोर असतो. मात्र, मला वाटते आता तो खरच झोपला होता.”
पहिल्या डावात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरलेल्या लॅब्युशेनने दुसऱ्या डावात संघर्षपूर्ण खेळी केली आहे. त्याने तिसऱ्या दिवशी नाबाद राहत 39 धावा केल्या असून त्याच्याकडून ऑस्ट्रेलिया संघाला मोठी अपेक्षा असेल.
(Sreesanth Open Secret Of Marnus Labuchagne Nap In WTC Final Against India)
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविडवर दावा; म्हणाले, “…तो कोच म्हणून शुन्य”
IND vs AUS: भारत 296 धावांवर सर्वबाद, तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने गमावल्या चार महत्वाच्या विकेट्स