नुकतेच भारतीय क्रिकेट संघाच्या मेंटल कंडिशनिंग कोच म्हणून पॅडी अप्टन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघासोबत अप्टन सहभागीही झाले आहेत. खुद्द बीसीसीआयने अप्टन यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत याबद्दल माहिती दिली होती. यादरम्यान अप्टन यांच्या नियुक्तीच्या निर्णयावरून माजी भारतीय वेगवान गोलंदाज एस श्रीसंत याने चकित करणारी प्रतिक्रिया दिली आहे. आगामी टी२० विश्वचषकात भारतीय संघासोबत काम करताना अप्टन विशेष चमत्कार नाही करुन दाखवू शकणार, असे श्रीसंतने म्हटले आहे.
भारतीय संघाचे विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या शिफारशीनंतर टी२० विश्वचषक २०२२ पर्यंत (t20 World Cup 2022) अप्टन यांना मेंटल कंडिशनिंग कोच (Team India Mental Conditioning Coach) म्हणून संघासोबत जोडण्यात आले आहे. अप्टन यांनी यापूर्वीही भारतीय संघासोबत काम केले आहे. ते २०११ विश्वचषक विजेत्या भारतीय संघाच्या स्टाफचा भाग होते. तसेच आयपीएलमध्येही त्यांनी द्रविडसोबत काम केले आहे.
परंतु श्रीसंतला अप्टन यांच्या नियुक्तीने जास्त फरक पडणार नाही असे वाटते. श्रीसंतनेही (S Sreesanth) अप्टनसोबत (Paddy Upton) काम केले आहे. २०११ विश्वचषकावेळी तोदेखील भारतीय सघाचा भाग होता. तसेच आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघात असतानाही अप्टन त्या संघाचे मेंटल कंडिशनिंग कोच होते.
Say Hello 👋🏻 to our Mental Conditioning Coach – Mr. Paddy Upton 😃#TeamIndia 🇮🇳 pic.twitter.com/KEjpnXuC81
— BCCI (@BCCI) July 26, 2022
मिड-डेशी बोलताना श्रीसंत म्हणाला की, “मला नाही वाटत अप्टन काही कमाल करून दाखवू शकतील. जर भारताने टी२० विश्वचषक जिंकला तर हे खेळाडू आणि प्रशिक्षक द्रविड यांच्या अनुभवामुळे साध्य झालेले यश असेल. आपल्याकडे एक शानदार युनिट उपलब्ध आहे. मला नाही वाटत की, अप्टनमुळे काही विशेष फरक पडणार आहे. देशांतर्गत क्रिकेट खेळतानाही तुम्हाला मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असावे लागते. तसेही खेळाडूंची आधीपासूनच मेंटल कंडिशनिंग होत आहे.”
एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखाली २०११ विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघावर अप्टनचा प्रभाव एक टक्केही नव्हता. फक्त नि फक्त द्रविडमुळे त्यांचे पुनरागमन झाले आहे.
“२०११ विश्वविजेत्या संघावर अप्टनचा फार काही प्रभाव नव्हता. ९९ टक्के काम तर प्रशिक्षक गॅरीनेच केले होते. अप्टन हे फक्त एक साहाय्यक होते. त्यांचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. कारण त्यांनी यापूर्वी राजस्थान रॉयल्समध्ये द्रविडबरोबर काम केले आहे. राहुल भाई निश्चितपणे त्यांचा चांगला उपयोग करून घेईल. कारण तो एक चांगला शिक्षक आहे”, असेही श्रीसंतने म्हटले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘त्याला डिलीट कर यार…’, पंतच्या इंस्टा लाईव्हदरम्यान रोहितचे लक्षवेधी भाष्य
WTC: श्रीलंकेने पाकिस्तानला धूळ चारताच टीम इंडियाला होणार मोठा फायदा, वाचा काय आहे समीकरण
WIvIND: अखेरच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल शिखरच्या बाजूने; अर्शदीपचे वनडे पदार्पण नाहीच