---Advertisement---

केन विलियम्सनला KKR विरुद्ध का दिली नाही संधी? संघ प्रशिक्षकाने सांगितले कारण

On: सोमवार, एप्रिल 12, 2021 3:59 PM
---Advertisement---

जगातील सर्वात प्रसिद्ध टी-20 लीग अर्थात आयपीएलच्या 14 व्या सत्राला सुरुवात झाली असून काल (11 एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात या स्पर्धेतील तिसरा सामना खेळवण्यात आला. या सामन्यानंतर हैदराबाद संघाचे मुख्य प्रशिक्षक ट्रेवर बेलिस यांनी केन विलियम्सनच्या तंदुरुस्ती बाबत वक्तव्य केले.

या सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत असताना बेलिस यांनी न्यूझीलंडचा फलंदाज केन विलियम्सनला तंदुरुस्त होण्यास अधिक वेळ लागणार आहे. याच कारणामुळे त्याला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात संघात स्थान देण्यात आले नसल्याचे सांगितले. याबरोबरच तंदुरुस्तीमुळे तो पुढील काही सामन्यांना मुकण्याचीही शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

विल्यमसनने मागील मोसमात हैदराबाद संघाकडून चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 12 डावात 317 धावा केल्या होत्या.

त्यांनी या पत्रकार परिषदेत म्हटले आहे की, “आम्हाला वाटते की विल्यमसनला तंदुरुस्त होण्यासाठी जास्त वेळ लागणार आहे. परंतु तो तंदुरुस्त झाल्यास जॉनी बेअरस्टोच्या जागी खेळू शकतो. परंतु भारताविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेत बेअरस्टोनेही चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे सध्यातरी आम्हाला काही चिंता वाटत नाही.” बेयरस्टोने केकेआरविरूद्धच्या सामान्यात 55 धावा फटकावल्या होत्या.

तसेच ते म्हणाले की, “इंग्लडकडून टी-20 मध्ये चौथ्या क्रमांकावर खेळणारा आणि एकदिवसीय सामन्यात सलामीला येणारा बेअरस्टो आयपीएलमध्येही डावाची सुरुवात चांगल्या प्रकारे करू शकतो. हे त्याच्या तंदुरुस्ती आणि सूर गवसण्यावरती अवलंबून आहे. परंतु तो डावाची सुरुवात चांगली करताना यष्टीरक्षकाचीही भूमिका बजावतो हेही आंम्हाला माहिती आहे. त्यामुळे आम्हाला त्याच्या रूपात एक चांगला पर्याय मिळतो. परंतु त्याने इंग्लंडकडून खेळताना चौथ्या क्रमांकावर चांगली कामगिरी केली आहे.”

महत्त्वाच्या बातम्या-

पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानी फलंदाजाला बाद करणारा भारतीय गोलंदाज पाहतोय पुनरागमनाची वाट, म्हणाला…

तुमसे मिलके दिल का है जो हाल क्या कहें! जेव्हा ‘हिटमॅन’ करू लागतो गोलंदाजीचा सराव, पाहा भन्नाट व्हिडिओ

‘वेल डन बॉइज,’ कोलकाता संघाची हैदराबादविरुद्ध विजयी सेंच्यूरी; संघमालकाने केलं तोंडभरुन कौतुक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---