इंडियन प्रीमियर लीगच्या तिसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमने सामने होते. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने १० धावांनी विजय मिळवला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघात विजय शंकरला अंतिम ११ जणांमध्ये संधी देण्यात आली होती. परंतु त्याने अवघ्या ११ धावांची खेळी केली. या सामन्यापूर्वी त्याने भारतीय संघात पुनरागमन करण्याबाबत मोठे वक्तव्य केले होते.
विजय शंकरला २०१८ मध्ये भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी देण्यात आली होती. तसेच त्याला २०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याचीही संधी मिळाली होती. त्यानंतर तो दुखापतीमुळे संघातून बाहेर झाला होता.
त्याने ईएसपीएन क्रिकइंफोला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे की, “जेव्हा मी माझ्या रूममध्ये एकांतात बसलेलो असतो. तेव्हा मी खेळलेल्या खेळींचे व्हिडिओ पाहत असतो. माझ्या डोक्यात भारतीय संघात पुनरागमन करण्याचा विचार नेहमीच येत असतो. एक खेळाडू म्हणून तुम्हीच नेहमीच संघात पुनरागमन करण्यासाठी जोर लावण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु यावेळेस मी दुसरा पर्याय निवडला आहे. मी स्वतःवर चांगलं प्रदर्शन करण्यासाठी आणि भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी प्रेशर येऊ देणार नाही. फक्त खेळाचा आनंद घ्यायचा आहे. मला चांगले प्रदर्शन करायचे आहे. ”
शंकरला भारतीय संघात ‘थ्रीडी खेळाडू’ म्हणून स्थान देण्यात आले होते. तसेच त्याची तुलना हार्दिक पंड्या सोबत केली जाऊ लागली होती. परंतु शंकरला संधी देऊनही साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. त्याला पाकिस्तान संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात, भुवनेश्वर कुमार दुखापतग्रस्त झाल्यामुळे गोलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. त्या सामन्यात त्याने पहिल्याच चेंडूवर त्याने भारतीय संघाला विकेट मिळवून दिला होता.
तसेच त्याने २०१९ मध्ये ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध आपला शेवटचा टी-२० सामना खेळला होता. या सामन्यात त्याने ३८ धावा देत २ विकेट घेतल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
आपल्या वाणीने लाखो आयपीएलप्रेमींना घायाळ करणारी ‘ती’ यंदाही गेली कुठे? चाहत्यांनी काढली आठवण
‘वेल डन बॉइज,’ कोलकाता संघाची हैदराबादविरुद्ध विजयी सेंच्यूरी; संघमालकाने केलं तोंडभरुन कौतुक