---Advertisement---

‘काही नवे, तर काही जुने’, सनरायझर्स संघात तीन महत्त्वाच्या सदस्यांचं झालं जंगी स्वागत

On: शुक्रवार, मार्च 18, 2022 6:28 PM
SRH
---Advertisement---

इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामाचे बिगूल वाजले आहेत. त्यामुळे आता सर्वांनाच आयपीएलच्या या १५ व्या हंगामातील सामन्यांची उत्सुकता लागली आहे. या हंगामाला २६ मार्चपासून सुरुवात होणार आहे. दरम्यान, या हंगामासाठी आता सर्वच संघांची अंतिम टप्प्यातील तयारी सुरु आहे. या हंगामात केन विलियम्सनच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या सनरायझर्स हैदराबादचा ट्रेनिंग कॅम्पदेखील मुंबईत लागला आहे. या कॅम्पमध्ये हळूहळू खेळाडू सामील होत आहेत. 

नुकतेच हैदराबादच्या (Sunrisers Hyderabad) या कॅम्पमध्ये डेल स्टेन (Dale Steyn), भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आणि वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) या सदस्यांचा समावेश झाला आहे. त्यामुळे त्यांचे संघाकडून जोरदार स्वागत झाले आहेत. स्टेन आणि भुवनेश्वर हे दोघेही यापूर्वी हैदराबादकडून खेळले आहेत, तर वॉशिंग्टन सुंदर नव्याने संघात सामील झाला आहे. त्याला आयपीएल लिलावादरम्यान ८.७५ कोटी रुपयांमध्ये हैदराबादने १५ व्या हंगामासाठी खरेदी केले आहे.

त्याचबरोबर यंदा स्टेन हैदराबाद संघात खेळाडू म्हणून नाही, तर गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून सामील झाला आहे, तर भुवनेश्वर कुमार गेल्या अनेक वर्षांपासून हैदराबाद संघाचा भाग आहे. या तिघांचे आयपीएल २०२२ हंगामासाठी संघात प्रशिक्षक टॉम मूडी यांनी जोरदार स्वागत केले.

या तिघांची आधी त्यांनी ओळख करून दिली. ते म्हणाले, ‘आपल्या ऑरेंज आर्मीमध्ये काही नवीन लोक सामील झाले आहेत. वॉशी (वॉशिंग्टन) तुझे स्वागत आहे. मित्रा, तुला इथे पाहून छान वाटत आहे, ऑरेंज आर्मीमधील नवीन सदस्य. भुवी, ऑरेंज आर्मीचा जुना सदस्य आहे. तुझे पुन्हा एकदा स्वागत आहे. आता महान वेगवान गोलंदाजांपैकी एक डेल तुझेही पुन्हा एकदा स्वागत. तो आता खेळणार नाही, पण प्रशिक्षण देणार आहे.’

डेल स्टेन आयपीएलमध्ये पहिल्यांदाच प्रशिक्षकाच्या रुपात दिसणार आहे. दरम्यान त्यानेही विश्वास बाळगला आहे की, तो संघाला जेतेपद मिळवून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेल.

सनरायझर्स हैदराबाद आयपीएल २०२२ मध्ये (IPL 2022) आपल्या अभियानाला २९ मार्चपासून सुरुवात करणार आहे. त्यांना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, गहुंजे स्टेडियमवर संध्याकाळी ७.३० वाजता आपला पहिला सामना राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध खेळायचा आहे.

या हंगामात हैदराबादचा ‘गट ब’ मध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ते या हंगामात चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स या ‘गट ब’ मधील संघांशी प्रत्येकी दोन सामने खेळणार आहेत. तसेच ‘गट अ’ मधील कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दोन, तर मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनऊ सुपर जायंट्स संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळणार आहेत.

हैदराबाद या हंगामात मागील हंगामातील खराब कामगिरी विसरुन नव्याने आणि चांगली कामगिरी करण्यास उत्सुक असणार आहेत. यंदा आयपीएलमधील सर्व साखळी फेरीतील सामने पुणे आणि मुंबईत खेळवले जाणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

इंग्लिश ते थेट हिंदी, इंग्लंडच्या खेळाडूने हिंदीमध्ये विचारले आयपीएलप्रेमींचे हाल-चाल; Video तुफान व्हायरल

वडिलांच्या निधनाने खचलेल्या सिराजला टीम इंडियाच्या ‘या’ व्यक्तीने दिला होता आधार; स्वत: केला मोठा खुलासा

विंडीज गोलंदाजाने क्रिकेटमध्ये आणले नवे बेबी सेलिब्रेशन; मैदानातच व्हिडिओ कॉल करत म्हटले, ‘हाय बेबी’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---