इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत दोन संघ खूपच खराब कामगिरी करताना दिसत आहेत. ते संघ म्हणजेच दिल्ली कॅपिटल्स आणि दुसरा म्हणजे सनरायझर्स हैदराबाद होय. हैदराबादने नुकताच आपला 9वा सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळला. या सामन्यात हैदराबाद संघाला 5 धावांनी नजीकचा पराभव पत्करावा लागला. हैदराबादचा हा हंगामातील सहावा पराभव होता. या पराभवानंतर हैदराबादचा कर्णधार एडेन मार्करमने प्रतिक्रिया दिली. चला तर मार्करम काय म्हणाला जाणून घेऊयात…
कोलकाता नाईट रायडर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 9 विकेट्स गमावत 171 धावा केल्या. या धावा करताना कोलकाताकडून रिंकू सिंग (Rinku Singh) याने सर्वाधिक 46 धावा केल्या. कोलकाताच्या या आव्हानाचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबाद संघाला 8 विकेट्स गमावत 166 धावाच करता आल्या. त्यामुळे हैदराबादने 5 धावांनी पराभव पत्करला. हा सामना गमावल्यानंतर एडेन मार्करम (Aiden Markram) याने मोठी प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, हा पराभव पचवणे कठीण होईल.
हैदराबादचा कर्णधार मार्करम सामन्यानंतर म्हणाला की, “आम्ही सामन्यात अधिकतर काळ चांगले क्रिकेट खेळलो, पण दबावातील क्षणांमध्ये चूक झाली. हा पराभव पचवणे कठीण होईल. हेन्रीच क्लासेनने शानदार फलंदाजी केली आणि माझ्यावरील दबाव हटवला. मात्र, त्या भागीदारीला आणखी पुढे न्यायला पाहिजे होते.”
In Match 47 of #TATAIPL between #SRH & #KKR
Here are the Dream11 GameChanger, RuPay On-The-Go 4s of the match & TIAGO.ev Electric Striker award winners. @Dream11 | #SabKhelenge@RuPay_npci | #RuPayCreditonUPI | #BeOnTheGo
@Tatamotorsev | #Tiagoev | #Goev pic.twitter.com/4rIll5eMio— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2023
पुढे बोलताना तो म्हणाला की, “आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. फलंदाजांनीही काही भागीदाऱ्या केल्या, पण त्या पुरेशा नव्हत्या. आक्रमक खेळण्याच्या प्रयत्नात फलंदाज चूक करतात.”
Varun Chakaravarthy is adjudged Player of the Match for his bowling figures of 1/20 as #KKR snatch a thrilling victory.
Scorecard – https://t.co/dTunuF3Ie4 #TATAIPL #SRHvKKR #IPL2023 pic.twitter.com/UwnB2U6IG7
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2023
सनरायझर्स हैदराबादकडून या सामन्यात एडेन मार्करमने 40 चेंडूत 41 धावा केल्या. तसेच, क्लासेनने 20 चेंडूत 36 धावा केल्या. त्यांच्यात 70 धावांची भागीदारी झाली. मात्र, त्यांनी एकापाठोपाठ एक विकेट गमावल्यानंतर खालच्या फळीतील फलंदाज दबावाचा सामना करू शकले नाहीत. शेवटच्या षटकात हैदराबादला विजयासाठी 9 धावांची गरज होती. तसेच, त्यांच्या हातात 9 धावा शिल्लक होत्या. यावेळी वरुणने 3 धावा खर्च करत अब्दुल समदची विकेट काढली. या कामगिरीसाठी चक्रवर्तीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. (srh vs kkr skipper aiden markram said hard to swallow losses like these)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आधी गंभीरला नडला, नंतर विराटने आख्ख्या जगाला सांगितलं, कोण आहे ‘क्रिकेटचा खरा बॉस’, वाचाच
‘नवीनचा बाप आहे कोहली’, लखनऊने नवीनचा धोनीसोबतचा फोटो शेअर करताच भडकले चाहते, पाहा कमेंट्स