दीपक हुड्डा इनोवेटिव स्ट्रोक्स खेळण्यासाठी ओळखला जातो. या दृष्टीकोनाचा त्याला खुप फायदा होत आहे. परंतु लखनऊ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्या सामन्यावेळी त्याचा हा दृष्टीकोन चुकीचा ठरला. भुवनेश्वर कुमारने सीमारेषेवर शानदार प्रयत्न केला आणि दोन सेकंदासाठी सर्वांना एबी डिविलियर्सची आठवण झाली. त्याचा हा प्रयत्न व्यर्थ ठरला आणि हुड्डाची सुटका झाली. भुवनेश्वर कुमारच्या (Bhuvneshwar Kumar) या प्रयत्नाने हुड्डाचा श्वास अडकला होता.
उमरान मलिकने टाकलेल्या १० व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर दीपक हुड्डाने थर्ड अंपायरच्या दिशेने कट खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू सीमारेषेकडे गेला, तेथे भुवनेश्वर कुमार तिथे क्षेत्ररक्षणासाठी उभा होता. त्याने हवेत उडी मारली आणि चेंडू पकडण्याचा पूर्ण प्रयत्न केला. परंतु त्याला तो झेल घेता आला नाही आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला.
लखनऊ संघासाठी हे षटक महत्त्वाचे ठरले, कारण या षटकातून २० धावा मिळाल्या. उमरान मलिक १४० हून अधिक गतीने गोलंदाजी करत होता, परंतु हुड्डाने त्याचा गतीकडे लक्ष न देता संघाला धावा करुन दिल्या. या षटकात त्याने हा षटकार लगावण्याच्या अगोदर तीन चौकार ठोकले होते.
https://twitter.com/Peep00470121/status/1510996780347183107?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1510996780347183107%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketnmore.com%2Fcricket-news%2Fsrh-vs-lsg-bhuvneshwar-kumar-became-ab-de-villiers-deepak-hooda-stuck-97068
या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. लखनऊने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकात ७ विकेट्स गमावत १६९ धावा केल्या होत्या. कर्णधार केएल राहुलने यात सर्वाधिक ६८ धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबाद संघाने २० षटकात ९ विकेट्स गमावत १५७ धावा केल्या आणि हा सामना १२ धावांनी गमावला.
लखनऊ संघाने आत्तापर्यंत तीन सामने खेळले असून पहिल्या सामन्यात संघाला गुजरातने ५ विकेट्सने पराभूत केले, तर दूसऱ्या सामन्यात संघाने सीएसकेला ६ विकेट्सने पराभूत केले आणि तिसऱ्या सामन्यात हैदराबादला १२ धावांनी पराभूत केले. आता संघ आपला चौथा सामना ७ एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळणार आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
वेगवेगळ्या संघांकडून खेळत असले तरीही बॉन्डिंग तीच! चहल आणि मॅक्सवेलच्या भेटीचे फोटो व्हायरल
आवेशने विकेट्सचा चौकार ‘तिला’ केला समर्पित; म्हणाला, ‘ती हॉस्पिटलमधूनही मला प्रेरणा देत होती’
अर्रर्र! आरसीबीसाठी ट्रेनिंग सुरू करूनही मॅक्सवेल खेळणार नाही आजचा सामना; पण कधी उतरणार मैदानात?