सोमवारी (०४ एप्रिल) आयपीएल २०२२चा बारावा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात होणार आहे. हा सामना जिंकत लखनऊला त्यांचा हंगामातील दुसरा विजय नोंदवण्याची संधी असेल. तर हैदराबादचा संघ त्यांच्या विजयाचे खाते उघडण्यासाठी प्रयत्नशील असेल. तत्पूर्वी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्यााकाळी ७ वाजता नाणेफेक झाली आहे. हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली आहे.
लखनऊ संघात केवळ १ बदल करण्यात आला आहे. दुष्मंथा चमीराला बाहेर बसवत अष्टपैलू जेसन होल्डरचे संघात पुनरागमन झाले आहे. तर हैदराबादचा संघ विनाबदलासह मैदानात उतरला आहे.
#SRH have won the toss and will bowl first against #LSG.
Live – https://t.co/89IMzVlZVN #SRHvLSG #TATAIPL pic.twitter.com/ZDxKAoqCeN
— IndianPremierLeague (@IPL) April 4, 2022
लखनऊ सुपरजायंट्स – केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), मनिष पांडे, एविन लुईस, दीपक हुडा, आयुष बदोनी, कृणाल पंड्या, जेसन होल्डर, अँड्र्यू टाय, रवी बिश्नोई, आवेश खान
A look at the Playing XI for #SRHvLSG
Live – https://t.co/89IMzVls6f #SRHvLSG #TATAIPL pic.twitter.com/rmZI4Tpxfa
— IndianPremierLeague (@IPL) April 4, 2022
सनरायझर्स हैदराबाद– केन विलियम्सन (कर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), एडेन मार्करम, अब्दुल सामद, रोमारियो शेफर्ड, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
पंत जिथे, इंटरटेनमेंट तिथे! टॉसवेळी दिल्लीच्या कर्णधाराकडून झाली अशी काही चूक की सर्वत्र पिकला हशा
“एकेकाळी मी २०१५ विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होतो, पण नंतर सर्व बदललं”
‘भाई ३डी चष्मा घातलेला का?’, लिविंगस्टोनचा सोपा झेल सोडलेला अंबाती रायुडू ट्रोलर्सच्या निशाण्यावर