सेंट लुसिया येथे विंडिज विरुद्ध श्रीलंका संघात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सामना पंचांनी चेंडू बदलण्याच्या घेतलेला निर्णय मान्य नसल्याने श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडिमलने खेळायला येण्यास नकार दिला.
श्रीलंका संघाने हा नकार दिला कारण आयसीसी पंच अलीम दार आणि इयान गोल्ड यांनी चेंडूची पहाणी केल्यानंतर चेंडू बदलण्याचा आणि विंडीजला 5 पेनल्टी धावा देण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानंतर बऱ्याच गोंधळानंतर आणि चर्चेनंतर दोन तासाने श्रीलंकेचा संघ खेळण्यासाठी मैदानात उतरला. त्यामुळे सामन्याच्या तिसऱ्या दिवशीचा खेळाला दोनतास उशिर झाला.
अखेर चेंडू बदलल्यानंतर विंडिजचा संघ 4 बाद 241 धावांवरून 300 धावांवर सर्वबाद झाला. विंडिजचे उर्वरित 6 फलंदाज फक्त 59 धावात बाद झाले.
श्रीलंकाच्या खेळाडूंनी कोणतेही गैरकृत्य केले नसल्याचे श्रीलंका क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे. त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की ‘श्रीलंका क्रिकेटने संघाला खेळ चालू ठेवण्याचा सल्ला दिला आहे. खिलाडूवृत्तीने निषेध करत खेळ चालू ठेवण्याच्या खेळाडूंच्या निर्णयाची प्रशंसा करत आहोत.’
‘संघ व्यवस्थापनाने आम्हाला श्रीलंकन खेळाडूंनी कोणतेही गैरकृत्य केले नसल्याचे कळवले आहे. जर संघाच्या सदस्याविरुद्ध अनावश्यक आरोप लावले गेले तर श्रीलंका क्रिकेट कोणत्याही खेळाडूचे बचाव करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलेल.’
यासर्व प्रकारानंतर तिसऱ्या दिवसाखेर श्रीलंकेने दुसऱ्या डावात 1 बाद 34 धावा केल्या आहेत. तसेच 13 धावांची आघाडी मिळवली आहे. त्यांनी विंडिजला पहिल्या डावात 300 धावांवर सर्वबाद केले.
क्रिकेटवरील “भारतीय क्रिकेटचे शापीत शिलेदार” लेखमालिकेतील खास लेख:
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १० – विस्मृतीत गेलेला अजय रात्रा
वाचा-
–मुंबई क्रिकेट सफरनामा भाग ३- मुंबई क्रिकेट कार्निवल- पंचरंगी स्पर्धा
महत्त्वाच्या बातम्या:
–हा मोठा खेळाडू म्हणतो अफगाणिस्तानला अजून वेळ दिला पाहिजे!
–अनुष्काच्या स्वच्छता मोहिमेला विराट कोहलीचा पाठिंबा
–लोढा समितीची पहिली विकेट; मुंबईकर अजित अागरकर बाद!