श्रीलंकेचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील ३ सामन्यांची टी२० मालिका नुकतीच संपली आहे. या मालिकेत यजमान इंग्लंड संघाने पाहुण्या श्रीलंकेला ३-० असा व्हाईटवॉश दिला. त्यातच आता श्रीलंका संघासाठी आणखी एक वाईट बातमी समोर येत आहे. त्यांच्या संघातील ३ खेळाडूंना बायोबबलच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे.
श्रीलंकेची मोठी कारवाई
श्रीलंकेला २६ जून रोजी इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या टी२० सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्या सामन्यानंतर श्रीलंकेचे कुशल मेंडिस, निरोशन डिकवेल्ला आणि दनुष्का गुणतिलका यांनी रात्री बायोबबलच्या बाहेर जात नियमांचे उल्लंघन केले. त्यामुळे त्यांच्यावर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने कडक कारवाई केली असून त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच त्यांना तातडीने मायदेशी परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
एका व्हिडिओने प्रकरण आणले समोर
हे प्रकरण एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर समोर आले होते. या व्हिडिओमध्ये दिसत होते की टी२० मालिकेनंतर डरहॅममधील रस्त्यांवर हे खेळाडू रात्री फिरत आहेत. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. तसेच चाहत्यांनी या खेळाडूंबद्दल नाराजी व्यक्त केली होती.
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे प्रमुख शम्मी सिल्वा यांनी सांगितले होते की या घटनेची चौकशी सुरु आहे. त्यानंतर आता श्रीलंकेच्या या ३ क्रिकेटपटूंवर थेट निलंबनाच्या कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे.
त्यांच्या निलंबनाच्या कारवाईबद्दल माहिती देताना श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे सचिव मोहन डी सिल्वा यांनी सांगितले की ‘श्रीलंका क्रिकेटच्या कार्यकारी समीतीने कुशल मेंडिस, दनुष्का गुणतिलका आणि निरोशन डिकवेल्ला यांच्यावर बायोबबलचे उल्लंघन केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे आणि त्यांना श्रीलंकेला परत येण्यात सांगितले आहे.'(Sri Lanka Cricket have suspended Kusal Mendis, Danushka Gunathilaka and Niroshan Dickwella for bio-bubble breach in England)
Familiar faces in Durham tonight, enjoying their tour! Obviously not here to play cricket, this video was taken at 23.28 Sunday. Disappointing performance by these cricket players but not forgetting to enjoy their night at Durham. RIP #SrilankaCricket #KusalMendis #ENGvSL pic.twitter.com/eR15CWHMQx
— Nazeer Nisthar (@NazeerNisthar) June 28, 2021
श्रीलंकेला खेळायची आहे वनडे मालिका
टी२० मालिकेतील दारुण पराभवानंतर आता श्रीलंका संघाला वनडे मालिकेसाठी सज्ज रहावे लागणार आहे. इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील वनडे मालिका २९ जूनपासून सुरु होणार आहे. पहिला वनडे सामना पहिला सामना डरहॅमला होईल. त्यानंतर १ जुलैला लंडनला तर ४ जुलैला ब्रिस्टोलला अनुक्रमे दुसरा आणि तिसरा वनडे सामना होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठ्या मनाचा साऊदी! ८ वर्षीय चिमुकलीसाठी करणार WTC फायनलमधील जर्सीचा लिलाव
WTC फायनलनंतर विराटची गळाभेट घेतानाच्या व्हायरल झालेल्या फोटोवर विलियम्सनने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
Video: शोएब अख्तरचा मुलगा ‘या’ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा फॅन; त्याच्याच गाण्यावर धरलाय ठेका