श्रीलंका क्रिकेट संघ १ जूनपासून सराव शिबिराला सुरुवात करणार आहे. या शिबिरात श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघातील १३ खेळाडू सहभागी होणार आहेत. याची घोषणा श्रीलंका क्रिकेट बोर्डाने केली आहे.
या शिबिरात सुरुवातीला सर्व स्वरूपातील गोलंदाजांचा सराव घेतला जाईल. हे शिबिर कोलंबो क्रिकेट मैदानावर होईल. शिबिरातील सर्व खेळाडूंना एका हॉटेलमध्ये ठेवले जाणार आहे. खेळाडूंच्या तंदुरुस्तीपासून हा सराव सुरू होणार आहे. जे हॉटेलमध्येच होईल, तर २ जूनला खेळाडू मैदानावर जातील.
या शिबिरात खेळाडूंबरोबर ४ प्रशिक्षकांसह सहाय्यक कर्मचारीही उपस्थित असतील. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (Sri Lanka Cricket Board) एका मुलाखतीत सांगितले, की सरकारच्या आरोग्य सूचनांचे पालन करत १२ दिवसांसाठी सराव शिबिराचे आयोजन केले जाणार आहे. क्रिकेट हा मोठ्या जोखमीचा खेळ आहे. त्यामुळे हे सराव शिबीर निवासी ठेवले आहे.
श्रीलंका क्रीडा मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालय यांच्या सूचनांनुसार खेळाडूंची सुरक्षा लक्षात घेऊन निर्धारित तयारीने या शिबिराचे आयोजन केले जाणार आहे.
या सरावासाठी एका वाहनाचा वापर केला जाईल. या सराव शिबिरादरम्यान खेळाडूंना खाजगी कामासाठी हॉटेलच्या बाहेर जाण्यास परवानगी दिली जाणार नाही. सुरक्षेसाठी सर्व प्रकारचे पाऊल उचलले जातील. श्रीलंकेपूर्वी इंग्लंड क्रिकेट संघाच्या खेळाडूंना सरावासाठी तयार केले जाणार असल्याची बातमी आली होती.
ही घोषणा इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (England Cricket Board) केली होती, तर वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने (West Indies Cricket Board) कसोटी मालिकेसाठी आपला संघ इंग्लंडला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही देशांमध्ये जैव-सुरक्षित चाचणी कसोटी मालिका खेळली जाईल. ही मालिका २ मैदानांवर खेळवली जाईल. मैदानही तीच निवडली जातील, जिथे जवळच हॉटेल असतील. कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) महामारीमुळे क्रिकेटला परत मैदानावर आणण्यासाठी प्रत्येक देश आपल्या पद्धतीने पाऊले उचलत आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-जगातील सर्वात मोठा अंपायरचं म्हणतोय, या ३ खेळाडूंची फलंदाजी माझी विशेष आवडती
-सौरव गांगुली बाद झाला रे झाला की ‘हा’ खेळाडू ढसाढसा रडायचा
-३ अशा घटना ज्यामध्ये दादाने दाखवून दिले होते की, तोच आहे खरा बॉस