अलीकडच्या काळात श्रीलंका क्रिकेट एका कारणांमुळे सतत चर्चेत येत आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने बऱ्याच महिन्यांपासून क्रिकेटपटूंना त्यांचा पगार दिला नाही. त्यामुळे करारावरून बोर्ड आणि खेळाडू यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत चालला असल्याचे दिसत आहे. या प्रकरणामुळे बरीच खळबळ उडाली होती आणि काही खेळाडूंनी निवृत्ती घेण्याची धमकीही बोर्डाला दिली होती.
अशा परिस्थितीत श्रीलंका क्रिकेट बोर्डाला प्रत्येक दौऱ्यानुसार करार देण्याबद्दल सांगावे लागेल होते. भारताविरूद्धच्या मालिकेआधीही ही बाब उफाळून आली होती. खेळाडूंनी करारावर सही करण्यास नकार दिला होता. मग भारतीय संघाविरुद्धच्या मालिकेसाठी खेळाडूंना पटवून देण्यात आले की या दौऱ्यामुळे श्रीलंका बोर्डाची चांगली कमाई होईल आणि खेळाडूंना त्यांचे पैसे मिळतील. असे असले तरीही, अद्याप कराराचा वाद पूर्णपणे संपलेला नाही. यामुळे खेळाडू देखील आर्थिक पेचात अडकले आहेत.
त्याचबरोबर अशी माहिती मिळाली आहे की, बर्याच खेळाडूंकडे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे आणि त्यांच्याकडे कर्ज आणि विमा भरण्याइतपतही पैसे नाहीत.
संडे मॉर्निंग वृत्तपत्रातील माहितीनुसार, खेळाडूंनी श्रीलंका क्रिकेटला याबाबत माहिती दिली आहे. आपली जुनी थकबाकी देण्याचा आणि कराराचा मान राखण्याची मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात बोर्डाला पत्र पाठविण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, नवीन करारामुळे आम्हाला जानेवारी 2021 पासून एक पैसाही मिळालेला नाही.
नवीन कराराबाबत खेळाडूंना अजून पूर्णपणे माहिती मिळाली नाही. याबद्दल त्यांना लेखी माहिती मिळायला पाहिजे होती. तसेच नव्या करारामध्ये खेळाडूंच्या पगारामध्ये 30 टक्के कपात करण्यात आली आहे. या विषयाशी संबंधित काही लोकांचे मत आहे की, बोर्ड आणि वरिष्ठ खेळाडूंमध्ये सुरू असलेल्या कराराबाबतच्या संघर्षामुळे कनिष्ठ खेळाडू अडचणीत आले आहेत.
अनेक खेळाडूंचे लग्न पुढे ढकले आहेत
माध्यमांतील वृत्तांनुसार अहवालात असे लिहिले आहे की, ‘वार्षिक करार नसल्यामुळे खेळाडूंवर वाईट परिणाम झाला आहे. गृहकर्जाचे हप्ते भरणे आणि कुटुंबातील सदस्यांना विम्याचे पैसे देणे त्यांच्यासाठी अवघड झाले आहे. बर्याच खेळाडूंनी त्यांचे विवाह पुढे ढकलले आहेत. त्याच बरोबर कनिष्ठ खेळाडू देखील या प्रकरणात अडकले आहेत. असे म्हटले जात आहे की, कराराशिवाय त्यांची कारकीर्द बुडेल. कारण सध्याच्या मालिकेत त्याची निवड झालेली नाही. कनिष्ठ खेळाडू आशा व्यक्त करीत आहेत की, ते लवकरच या वादातून मुक्त होतील आणि त्यांना त्यांचे वेतन मिळेल.’
महत्त्वाच्या बातम्या –
पाकिस्तानी दिग्गजाने आपल्याच देशाच्या फलंदाजांचे टोचले कान; म्हणे, ‘चाहरकडून काही तरी शिका’
भारतीय धुरंधर सूर्यकुमार यादव उत्कृष्ट कामगिरी करूनही आहे नाराज, स्वतः सांगितले त्यामागचे कारण






