मुंबई । श्रीलंकेचे तत्कालीन क्रीडामंत्री महिंदानंदा अलुथगामेगे यांनी 2011 च्या विश्वचषकातील भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेला अंतिम सामना फिक्स होता, असा खळबळजनक आरोप केला. यामुळे क्रिकेट जगतात एकच खळबळ उडाली आहे. श्रीलंकेचे विद्यमान क्रीडामंत्री डल्लास अलाहाप्पेरूमा यांनी या आरोपाची चौकशी करून दोन आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
अलुथगामेगेच्या मते, श्रीलंका संघाने भारताला हा सामना बहाल केला. तो सामना फिक्स होता. ते म्हणाले, “त्यावेळी देखील मी ही गोष्ट म्हणाला होतो. आम्हाला हा सामना जिंकायला हवा होता. मी खूप जबाबदारीने सांगतो की, हा सामना पूर्णपणे फिक्स होता.” हा सामना फिक्स असल्याचे कळताच लोकदेखील चिंतेत पडले आहेत.
मात्र, श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा आणि महेला जयवर्धनेने हे आरोप चुकीचे असल्याचे सांगत याबाबत चौकशी करण्याची मागणी केली आहे.
श्रीलंकेचा तत्कालीन कर्णधार संगकाराने याबाबत ट्विट करत लिहिले की, “आयसीसीने या प्रकरणाची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे.”
He needs to take his “evidence” to the ICC and the Anti corruption and Security Unit so the claims can be investigated throughly https://t.co/51w2J5Jtpc
— Kumar Sangakkara (@KumarSanga2) June 18, 2020
तसेच अंतिम सामन्यात शतक ठोकणाऱ्या जयवर्धनेने हे आरोप चुकीचे असल्याचे सांगितले. जयवर्धनने ट्विट केले की, “निवडणुका सुरु होणार आहेत? जे सर्कस सुरू झाले आहे ते ऐकून खूप आनंद वाटला. नाव आणि पुरावे?”
Is the elections around the corner 🤔Looks like the circus has started 🤡 names and evidence? #SLpolitics #ICC https://t.co/bA4FxdqXhu
— Mahela Jayawardena (@MahelaJay) June 18, 2020
अलुथगामगे म्हणाले की, “सामन्याचा निकाल फिक्स करण्यासाठी खेळाडू नव्हे तर काही पक्ष सामील होते.”
हा सामना पाहण्यासाठी अलुथगामगे आणि श्रीलंकेचे तत्कालीन राष्ट्रपती महिंद्रा राजपक्षे यांना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेला अंतिम सामना पाहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.
1996 च्या विश्वविजेत्या श्रीलंका संघाचे कर्णधार अर्जुन रणतुंगा याने देखील अलुथगामगे यांनी केलेल्या आरोपाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करुन जयवर्धनेच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतासमोर 275 धावांचे आव्हान ठेवले होते. यावेळी गौतम गंभीर (97) आणि त्यावेळीचा कर्णधार एमएस धोनी (91) यांच्या धावांच्या जोरावर भारताने विश्वचषकावर आपली मोहोर लावली. तब्बल 28 वर्षांनंतर भारताने विश्वचषक जिंकला होता.
ट्रेंडिंग घडामोडी –
२४ वर्षांपूर्वी भारतीय कसोटी क्रिकेटचा इतिहास नव्याने लिहिला गेला
मी ‘तो’ सल्ला दिला नसता तर गांगुली एक साधारण फलंदाजचं राहिला असता
गिलख्रिस्ट की धोनी? सर्फराज अहमद म्हणतो, ‘हा’ विकेटकीपर लईच भारी