गुरुवारी (12 जानेवारी) भारताने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात 4 विकेट्सने विजय मिळवला आणि मालिका नावावर केली. तत्पूर्वी मालिकातील पहिल्या सामन्यात संघाला 67 धावांनी विजय मिळला होता. श्रीलंकन संघ या पराभवानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एका नकोशा विक्रमाचा मानकरी ठरला.
उभय संघांतील दुसरा वनडे सामना कोलताच्या इडन गार्डन्स स्टेडियवर खेळला गेला. या मैदानातील खेळपट्टी गोलंदाजांसाठी अनुकूल असल्याचे पाहायला मिळाले. भारतीय संघाने नाणेफेक गमालल्यानंतर प्रथम गोलंदाजी केली. श्रीलंकन संघाचा प्रथम फलंदाजीचा निर्णय मात्र पूर्णपणे चुकीचा ठरला. प्रथम फलंदाजी करणारा श्रीलंका संघ 39.4 षटकांमध्ये 215 धावा करून सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 43.2 षटकात 6 विकेट्स गमावत हे लक्ष्य गाठले. पराभवानंतर श्रीलंका संघ आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त वनडे सामन्यांमध्ये पराभव पत्करणारा संघ ठरला.
यापूर्वी भारत आणि श्रीलंका आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वनडे सामने गमावण्याच्या बाबतीत बरोबरीवर होते. मात्र, गुरुवारी भारतीय संघाने विजय मिळवला आणि श्रीलंका या यादीत पहिल्या क्रमांकावर आला. श्रीलंकन संघआने आतापर्यंत खेळलेल्या एकूण वनडे सामन्यांपैकी 437 सामन्यांमध्ये पराभव स्वीकारला आहे. तर दुसरीकडे भारताने आतापर्यंत 436 वनडे सामने गमावले आहेत. यादीत तिसरा क्रमांक पाकिस्तान संघाचा येतो. पाकिस्तानने आतापर्यंत एकूण 419 वनडे सामन्यांमध्ये पराभव स्वीकारला आहे.
दरम्यान, सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारतासाठी केएल राहुल () मॅच विनर ठरला. राहुलने पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना 103 चेंडूत नाबाद 64 धावा कुटल्या. त्याचसोबत उपकर्णधार हार्दिक पंड्या () यानेही महत्वाच्या 36 धावांचे योगदान दिले. श्रीलंकेसाठी त्यांचा सलामीवीर नुवानिदू फर्नांडो याने सर्वाधिक 50 धावांचे योगदान दिले. गोलंदाजी विभागात भारतासाठी कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. (Sri Lanka have now become the team with the most defeats in ODIs )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हार्दिक-राहुलच्या चिवट फलंदाजीने कोलकाता वनडे टीम इंडियाच्या खिशात; मालिकेत घेतली अजिंक्य आघाडी
लायन शंतनु सिध्दा यांच्या स्मरणार्थ लायन्स प्रौढ टी-20 क्रिकेट स्पर्धेत पुणे लायन्स संघाचा विजय