भारत घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. यातील पहिला सामना जिंकत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे, तर दुसरा सामना गुरुवारी (12 जानेवारी) कोलकातामध्ये खेळला जाणार आहे. हा सामना जिंकत श्रीलंकेचा मालिकेत आव्हान कायम राखण्याचा आणि भारताचा मालिका जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. मागील सामन्यात पाहुण्या संघाने फलंदाजी उत्तम करत ते काही कमी नाही हे दाखवून दिले. दुसऱ्या सामन्यासाठी नाणेफेक झाली असता त्यामध्ये श्रीलंकेने पुन्हा एकदा बाजी मारली असून दोन्ही संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल झाला आहे.
श्रीलंकेने पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकली होती, आताही त्यांनी नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने भारताच्या अंतिम अकरामध्ये एक बदल सांगितला आहे. युझवेंद्र चहल याच्याजागी कुलदीप यादव ( Kuldeep Yadav) याला संधी देण्यात आली आहे. श्रीलंकेच्या संघातही दोन बदल झाले आहे. दिलशान मदुशंका आणि पथुम निसंका हे बाकावर बसले असून त्यांच्याजागी लाहिरू कुमारा आणि नुवांदू फर्नांडो यांना घेतले आहे.
कोलकाताच्या ईडन गार्डनची खेळपट्टी फलंदाजांसाठी पूरक आहे. त्यातच थंडीचे दिवस असल्याने दवामुळे फलंदाजांना मदत होणार आहे. श्रीलंकेसाठी गोलंदाजी चिंतेचा विषय ठरली आहे, कारण मागील सामन्यात त्यांच्या एकाही गोलंदाजाचा इकॉनॉमी रेट 6च्या खाली नव्हता. तसेच या खेळपट्टीवर चेंडू उसळी घेतो, तर वेगवान गोलंदाजांसाठी काळजीचा विषय नाही.
दुसऱ्या वनडेसाठी दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन-
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि कुलदीप यादव.
Sri Lanka have won the toss and elect to bat first in the 2nd ODI at Kolkata.
A look at our Playing XI for the game.
Live – https://t.co/jm3ulz5Yr1 #INDvSL @mastercardindia pic.twitter.com/DKNDtd6rYT
— BCCI (@BCCI) January 12, 2023
श्रीलंका- अविष्का फर्नांडो, नुवांदू फर्नांडो, दसून शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस (विकेटकीपर), चरिथ असलंका, धनंजया डी सिल्व्हा, वानिंदु हसरंगा, चामिका करुणारत्ने, लाहिरू कुमारा, दुनिथ वेलालगे, कसुन रजिथा.
2ND ODI. Sri Lanka XI: A Fernando, K Mendis (wk), D D Silva, N Fernando, C Asalanka, D Shanaka (c), W Hasaranga, C Karunaratne, D Wellalage, K Rajitha, L Kumara. https://t.co/MY3Wc5253b #INDvSL @mastercardindia
— BCCI (@BCCI) January 12, 2023
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराट विरुद्ध सचिन वादात गांगुलीची उडी! म्हणाला, ‘असेच कोणीही 45 शतके…’
वर्ल्ड सुपर लीगच्या गुणतालिकेत न्यूझीलंडने भारताला टाकले मागे, पाकिस्तानचेही नुकसान