---Advertisement---

विजयाच्या जवळ पोहोचूनही श्रीलंकेच्या पदरी निराशा, पण कर्णधाराने ‘असे’ भाष्य करत जिंकली लाखो मने

On: बुधवार, जुलै 21, 2021 11:16 AM
---Advertisement---

भारत आणि श्रीलंका संघामध्ये मंगळवारी (20 जुलै) एकदिवसीय मालिकेचा दुसऱ्या सामन्यात श्रीलंका संघाला पराभव पत्करावा लागला. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने तीन गडी राखून विजय मिळविला. श्रीलंकेने 50 षटकांत 9 बाद 275 धावा केल्या होत्या. हे लक्ष्य गाठत भारताने 5 चेंडू शिल्लक असताना 3 गडी राखून सामना जिंकला.

या सामन्यात श्रीलंका संघाचे काही वेळ सामन्यावर वर्चस्व होते. पण अचानक दीपक चहरने शानदार अर्धशतकी खेळी खेळत आपल्या बाजूने सामन्याचा निकाल लावला. आठव्या क्रमांकावर फलंदाजी चाहरने 82 चेंडूंत 7 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 69 धावा केल्या. हे त्याच्या वनडे कारकिर्दीतील पहिले अर्धशतक आहे. यानंतर विरोधी संघाचा कर्णधार शनाकाने मन जिंकणारी प्रतिक्रिया दिली आहे.

श्रीलंकेच्या कर्णधाराने सामन्यानंतर प्रतिक्रिया दिली
दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात झालेल्या पराभवानंतर कर्णधार दासुन शनाका म्हणाला की, “आमच्या संघातील खेळाडू दुसर्‍या सामन्यामध्ये ज्या पद्धतीने खेळले त्याचा मला अभिमान आहे. विजय मिळविण्यासाठी सर्वांनी खूप मेहनत घेतली. खरोखर हा खूप कठीण सामना होता. परंतु मी भारतीय खेळाडूंची प्रशंसा करू इच्छितो. विशेषत: दीपक चहर, ज्याने सामना आमच्या जबड्यातून खेचून घेतला.”

“पहिल्या एकदिवसीय सामन्याप्रमाणेच आम्हीसुद्धा दुसर्‍या वनडे सामन्यात चांगली सुरुवात केली. पण मधल्या षटकांत विकेट गमावल्या. आम्ही त्यांना सोपी विकेट देऊ नये आणि फलंदाजीतील पॉवरप्लेपर्यंत आम्हाला अधिक चांगली फलंदाजी करण्याची आवश्यकता आहे,” या शब्दांत शनाकाने आपल्या संघाच्या चूका सांगितल्या.

मी बऱ्याच दिवसांपासून गोलंदाजी केली नाही
दरम्यान शनाकाने स्वत: या सामन्यात गोलंदाजी करण्याच्या प्रश्नावर उत्तर दिले. तो म्हणाला की, “प्रत्यक्षात मी खूप दिवसांपासून गोलंदाजी केली नाही. कारण संघात बरेच गोलंदाज होते. पण मला दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात संधी मिळाली. त्यामुळे मी संधीचा फायदा घेत गोलंदाजी केली.” या सामन्यात शनाकाने तीन षटके टाकली आणि 10 धावा दिल्या व हार्दिक पांड्या (0) ची विकेट घेतली.

त्याशिवाय नॉन-स्ट्रायकर एंडवर फलंदाजी करणारे मनीष पांडे (37) यावा त्याने धावबाद केले. हे दोन्ही भारतीय फलंदाज एका मागोमाग 18 व्या षटकात पॅव्हेलियनला परतले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

चाहरचे अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर द्रविडने डगआऊटमधून दिला ‘सिक्रेट मॅसेज’ अन् भारताने मालिका खिशात घातली

राडा! टीम इंडियाकडून पराभूत झाल्यानंतर श्रीलंकेच्या कोच-कर्णधाराचा पीचवर राडा, अगदी…

शाबासकी तर द्यायलाच हवी! कोलंबोत धवनच्या टीम इंडियाने मिळवलेल्या विजयाचे सातासमुद्रापारहून विराटकडून कौतुक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---