श्रीलंकेचा संघ (Sri Lanka squad) सध्या भारत दौऱ्यावर असून यजमानांविरुद्ध टी२० मालिका खेळत आहे. ही मालिका झाली की भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात ४ मार्चपासून २ सामन्यांची कसोटी मालिका (Test Series)सुरू होणार आहे. या मालिकेसाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने १७ जणांचा कसोटी संघ (Test Squad) घोषित केला आहे.
श्रीलंकेच्या कसोटी संघात कुशल मेंडिस, निरोशान डिकवेल्ला आणि लहिरू थिरिमन्ने यांचे पुनरागमन झाले आहे. तर जॅफ्री वंडरसे याला पहिल्यांदाच कसोटी संघात स्थान मिळाले आहे.
भारताविरुद्धची कसोटी मालिका ही मेंडिस आणि डिलवेल्ला यांची त्यांच्यावरील बंदी संपल्यानंतरची पहिलीच कसोटी मालिका असणार आहे. त्यांच्यावर गेल्यावर्षी इंग्लंड दौऱ्यात बायोबबल आणि कर्फ्यू नियम मोडल्याबद्दल बंदी घालण्यात आली होती. पण आता ही बंदी पूर्ण झाली आहे.
त्याचबरोबर थिरिमन्नेने नोव्हेंबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळला नव्हता. त्याने पालकत्व रजा घेतली होती. त्यानंतर आता तो पुन्हा एकदा श्रीलंकेच्या संघात दाखल झाला आहे. तसेच वंडरसे याचे २०१५ मध्ये मर्यादीत षटकांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण झाले होते. पण त्याला अद्याप कसोटी पदार्पणाची संधी मिळालेली नाही. पण आता भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याचा श्रीलंका संघात समावेश असल्याने त्याला कसोटी पदार्पणाची संधी मिळू शकते.
याव्यतिरिक्त श्रीलंकेच्या संघात काही नेहमीची नावंही आहेत. श्रीलंकेच्या कसोटी संघाचे नेतृत्त्व दिमुथ करुणारत्नेने करणार आहे. संघात मधल्या फळीतील फलंदाजीसाठी पाथम निसंका, धनंजय डी सिल्वा, चरिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडीमल असे काही पर्याय आहेत. तसेच वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू चमिका करुणारत्ने याला देखील संघात संधी मिळाली आहे.
दरम्यान, कुशल मेंडिस याची जरी कसोटी संघात निवड झाली असली, तरी त्याची उपलब्धता त्याच्या फिटनेसवर अवलंबून असणार आहे. तसेच श्रीलंकेच्या या कसोटी संघात ओशाडा फर्नांडो, मिनोद भानुका, रोशन सिल्वा, लक्षण संदकन या खेळाडूंना संधी मिळालेली नाही (Sri Lanka named a 17-man squad for the upcoming two Tests against India).
श्रीलंका संघ २०१७ नंतर पहिल्यांदाच भारतात कसोटी मालिका खेळणार आहे. त्यांना २००८ नंतर भारताविरुद्ध कसोटी मालिका जिंकला आलेली नाही, त्यामुळे ते हा कसोटी मालिका विजयाचा दुष्काळ संपवण्याच्या प्रयत्नात असतील.
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिला सामना मोहालीला ४ ते ८ मार्चदरम्यान होईल. त्यानंतर १२ ते १६ मार्च दरम्यान बंगळुरू येथे दुसरा कसोटी सामना होईल. दुसरा कसोटी सामना हा दिवस-रात्र स्वरुपाचा असणार आहे. ही कसोटी मालिका आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असणार आहे.
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ –
दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), पाथम निसंका, लहिरू थिरिमन्ने, धनंजय डी सिल्वा (उपकर्णधार), कुशल मेंडिस (फिटनेसवर अवलंबून), अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडीमल, चारिथ असलंका, निरोशान डिकवेल्ला, चमिका करुणारत्ने, लहिरु कुमार, सुरंगा लकमल, दुष्मंथा चमीरा, विश्वा फर्नांडो, जॅफ्री वंडरसे, प्रवीण जयविक्रमा, लसिथ एम्बुल्डेनिया.
महत्त्वाच्या बातम्या –
व्हिडिओ: दुसऱ्या टी२० सामन्यासाठी टीम इंडिया धरमशालेत हजर; पण नाही झालं पारंपारिक स्वागत
लिएंडर पेसला तगडा झटका, एक्स लिव-इन पार्टनरने जिंकली कौटुंबिक हिंसेची केस; द्यावे लागणार इतके लाख
पहिल्या टी२०तील पराभवानंतर श्रीलंकेला दुहेरी धक्का! ‘हे’ २ खेळाडू भारताविरुद्धच्या मालिकेतून बाहेर