भारताचा मर्यादीत षटकांचा क्रिकेट संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात श्रीलंका विरुद्ध भारत संघात ३ वनडे आणि ३ टी२० सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकांसाठी शुक्रवारी (१६ जुलै) श्रीलंकेचा २४ जणांचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या सामन्यांना १८ जुलैपासून सुरुवात होणार आहे.
गेल्या काही दिवसात श्रीलंका क्रिकेटमध्ये कोरोना व्हायरसचे वादळ आले होते. इंग्लंड दौऱ्यावरुन परतल्यानंतर श्रीलंका संघातील काही सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्याचकारणामुळे श्रीलंका विरुद्ध भारत संघातील मालिकांचे वेळापत्रक बदलण्यात आले. बदलल्या वेळापत्रकानुसार १३ जुलै ऐवजी १८ जुलैपासून भारत आणि श्रीलंका संघातील सामन्यांना सुरुवात होणार आहे.
श्रीलंका संघाचे कर्णधारपद दसून शनकाला देण्यात आहे आहे. त्याला कुशल परेरा ऐवजी हे पद दिले असून परेरा वनडे आणि टी२० मालिकेतून उजव्या खांद्याच्या दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. तसेच वेगवान गोलंदाज बिनुरा फर्नांडो देखील या वनडे मालिकेमधून बाहेर पडला आहे. तसेच भारताविरुद्धच्या वनडे आणि टी२० मालिकेसाठी श्रीलेकेच्या संघाचे उपकर्णधारपद धनंजय डी सिल्वाकडे सोपवण्यात आले आहे.
तसेच या संघात लहिरु उडारा, शिरन फर्नांडो आणि इशान जयरत्ने यांनाही संंघात संधी मिळाली आहे. त्यामुळे त्यांना पदार्पण करण्याची संधी मिळेल. याबरोबरच धनंजय लक्षण आणि प्रविण जयविक्रम या युवा खेळाडूंचीही श्रीलंका संघात निवड केली आहे. त्याचबरोबर लहिरु कुमारचे संघात पुनरागमन झाले आहे.
Sri Lanka 🇱🇰 squad for the 3-match ODI series & the 3-match T20I series against India 🇮🇳 – https://t.co/qVd9nJxpau#SLvIND pic.twitter.com/9gqEGVlM79
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) July 16, 2021
या दिवशी होणार सामने
बदललेल्या वेळात्रकानुसार भारताच्या श्रीलंका दौऱ्यातील सामन्यांना १८ जुलैपासून वनडे मालिकेने सुरुवात होईल. १८ जुलैनंतर २० आणि २३ जुलै रोजी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा वनडे सामना खेळला जाईल. त्यानंतर २५ जुलैपासून टी२० मालिकेला सुरुवात होईल. टी२० मालिकेतील सामने अनुक्रमे २५, २७ आणि २९ जुलै रोजी खेळले जातील. वनडे आणि टी२० मालिकेतील सर्व सामने कोलंबो येथेच होणार आहेत.
भारताविरुद्धच्या वनडे आणि टी२० मालिकेसाठी श्रीलंका संघ –
दसून शनका (कर्णधार), धनंजय डी सिल्वा, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, पथम निसान्का, चरिथ असलांका, वनिंदू हसरंगा, अशेन बंदरा, मिनोद भानुका, लाहिरू उडारा, रमेश मेंडिस, चमिका करुणारत्ने, बिनूरा फर्नांडो (फक्त टी२० मालिकेसाठी) दुशमंथा चमीरा, लक्षण संदकन, अकिला धनंजया, शिरन फर्नांडो, धनंजय लक्ष्मण, ईशान जयरत्ने, प्रवीण जयविक्रम, असिता फर्नांडो, कसून रजीता, लाहिरू कुमारा, इसुरु उडाना.
असे आहे श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यातील सामन्यांचे वेळापत्रक
वनडे मालिका –
१८ जुलै – पहिला वनडे सामना, कोलंबो, (भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३ वाजता)
२० जुलै – दुसरा वनडे सामना, कोलंबो, (भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३ वाजता)
२३ जुलै – तिसरा वनडे सामना, कोलंबो, (भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३ वाजता)
टी२० मालिका –
२५ जुलै – पहिला टी२० सामना, कोलंबो, (भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८ वाजता)
२७ जुलै – दुसरा टी२० सामना, कोलंबो, (भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८ वाजता)
२९ जुलै – तिसरा टी२० सामना, कोलंबो, (भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८ वाजता)
महत्त्वाच्या बातम्या –
‘हार्दिक भविष्यात धोनीसारखा खतरनाक फिनिशर बनेल’; पाहा कोणी व्यक्त केलाय विश्वास
मुरलीधरनचा लेक मैदान गाजवण्यासाठी होतोय सज्ज, त्याच्या गोलंदाजीत तुम्हालाही दिसेल बापाची छबी
‘मी केकेआरसाठी समस्या होतो, पण त्यावेळी मॉर्गनला कर्णधार बनायचे नव्हते,’ कार्तिकचा उलगडा