---Advertisement---

आशिया चषकात नव्या ‘मलिंगा’चा कहर! फलंदाजांना दिवसा दाखवलं चांदणं, व्हिडिओ सर्वत्र व्हायरल

On: शनिवार, डिसेंबर 25, 2021 11:21 PM
New-Malinga-Bowling
---Advertisement---

सध्या यूएईत खेळल्या जात असलेल्या १९ वर्षाखालील आशिया चषकात (u19 asia cup 2021-22) श्रीलंका संघाचा दुसरा ‘मलिंगा’ पाहायला मिळाला. गुरुवारी (२३ डिसेंबर) आशिया चषकात १९ वर्षाखालील श्रीलंका आणि कुवेत (srilanka u19 vs kuwait u19) संघात आमना सामना झाला. या सामन्यात श्रीलंका संघाने माठा विजय मिळवला. सामन्यादरम्यान श्रीलंका संघाचा युवा वेगवान गोलंदाज मथीशा पथिराना (matheesha pathirana) याने अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन केले. मथीशाची गोलंदाजी पाहून चाहत्यांना दिग्गज लसीथ मलिंगाची आठवण झाली.

श्रीलंका संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली आणि ५० षटकात ५ विकेट्सच्या नुकसानावर ३२४ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला कुवेत संघ खूपच स्वस्तात गुंडाळला गेला. कुवेत संघ या सामन्यात १७.३ षटकात अवघ्या ४९ धावा करून सर्वबाद झाला. परिणामी श्रीलंकेने या सामन्यात तब्बल २७४ धावांनी मोठा विजय मिळवला.

मथीशाने या सामन्यात टाकलेल्या ३ षटकात ७ धावा दिल्या आणि २ विकेट्स घेतल्या. त्याव्यतिरिक्त श्रीलंकेचा कर्णधार डुनिथ वेललेजने ४ विकेट्स घेतल्या, तर सदिशा राजपक्षेने ३ विकेट्स घेतल्या.

मथीशा पथिरानाने या सामन्यात केलेल्या गोलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली. सोशल मीडियावर त्याच्या गोलंदाजीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्याची गोलंदाजी पाहून चाहत्यांनी लसीथ मलिंगाची आठवण काढली. त्याने या सामन्यात हुबेहूब मलिंगासारखी गोलंदाजी केली. यादरम्यान त्याचे यॉर्कर आणि बाउंसर चेंडूही पाहायला मिळाले. या सामन्यात मथीशाने केलेली गोलंदाजी पाहून तो लवकरच श्रीलंकेच्या वरिष्ठ संघात स्वतःचे स्थान बनवेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, ही पहिली वेळ नाही, जेव्हा मथीशा चर्चेत आला आहे. यापूर्वी २०२० मध्ये १९ वर्षाखालील विश्वचषकात खेळताना त्याने अशाच प्रकारचे उत्कृष्ट प्रदर्शन केले होते आणि चाहत्यांच्या नजरेत आला होता. त्यावेळी त्याची मलिंगाप्रमाणे गोलंदाजी करण्याची ऍक्शन पाहून चाहते चकित झाले होते. एवढेच नाही, तर आयपीएल २०२१ मध्ये चेन्नई सुपर किंग्जने मथीशाला राखीव गोलंदाजाच्या रूपात संघात बोलवले होते. अशात, आता मलिंगाने निवृत्ती घेतली असली, तरी मथीशा आयपीएलमध्ये त्याची कमी भरून काढेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

महत्वाच्या बातम्या –

Vijay Hazare Trophy: हिमाचल प्रदेशला पहिले जेतेपद पटकावण्याची सुवर्णसंधी, फायनलमध्ये तमिळनाडूशी करणार दोन हात

प्रो कबड्डी २०२१: यूपी योद्धांचा जबरदस्त विजय, पटणा पायरेट्सवर ३६-३५ च्या फरकाने केली मात

रोहित तर आहेच, पण त्याच्यानंतर कोण? रवी शास्त्रींनी सांगितले भारताच्या कर्णधारपदाचे २ भावी उमेदवार

व्हिडिओ पाहा –

बॉक्सिंग डेचा अर्थ, त्याचा इतिहास आणि बरचं काही... | What is Boxing Day Test? History of Boxing Day

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---