---Advertisement---

4 षटकार, 300चा स्ट्राईक रेट! हॅरी ब्रूकने उडवली विरोधी संघांची झोप, टी20 वर्ल्डकपसमोर घरच्याच मैदानावर श्रीलंका…

On: सोमवार, फेब्रुवारी 2, 2026 8:59 AM
---Advertisement---

आयसीसी पुरूष संघांचा टी२० विश्वचषक २०२६ येत्या ७ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. याआधीच श्रीलंकेला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले आहे. सध्या श्रीलंका विरुद्ध इंग्लंड यांच्यात टी२० मालिका खेळली जात आहे. यातील दुसरा सामना यजमान श्रीलंकेने ६ विकेट्सने गमावला. या मालिकेतील पहिला सामनाही इंग्लंडनेच जिंकला. आता केवळ एकच सामना बाकी असून ती एक औपचारिकताच असणार आहे. शेवटच्या सामन्यात उत्तम कामगिरी करत तो सामना जिंकण्याच्या प्रयत्नात श्रीलंका असणार आहे.

या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने ११ धावांनी जिंकला होता. दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने ५ विकेट्स गमावत १८९ धावसंख्या केली होती. पावसामुळे इंग्लंडला १७ षटकात १६८ धावा करण्याचे लक्ष्य मिळाले. ज्यामध्ये इंग्लंडच्या टॉम बॅटनचे अर्धशतक आणि कर्णधार हॅरी ब्रूकच्या ३००च्या स्ट्राईक रेटने श्रीलंकेची स्थिती खराब झाली. यामध्ये इंग्लंडने १६.४ षटकातच ४ विकेट्स गमावत १७४ धावा केल्या.

या सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने पहिल्या दोन विकेट्स लवकरच गमावल्या. त्यांची स्थिती ७.२ षटकात ५७ धावसंख्येवर २ विकेट्स अशी होती. पावसामुळे व्यत्यय आल्याने सामना एक तास उशिरा सुरू झाला. ज्यामध्ये बॅटनने ३३ चेंडूत नाबाद ५४ धावा केल्या. सलामीवीर जोस बटलरनेही ६ चौकारासह २९ चेंडूत ३९ धावा केल्या. ब्रूकने स्फोटक फलंदाजी केली. त्याने ४ षटकार आणि २ चौकारसह १२ चेंडूत ३६ धावा केल्या. सॅम करननेही १४ चेंडूत २० धावा केल्या.

या सामन्यात नाणेफेक जिंकत इंग्लंडने प्रथम क्षेत्ररक्षण केले होते. पथुम निसांका आणि कामिल मिशारा यांनी श्रीलंकेला चांगली सुरूवात केली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी ५६ धावा केल्या. निसांका ३४ धावा तर मिशारा ३६ धावा करत बाद झाले. कुशल मेंडीसनेही ताबडतोब फलंदाजी करत संघाला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत केली . त्याने १७ चेंडूत ४ चौकार आणि एका षटकार मारत ३२ धावा केल्या.

श्रीलंकेकडून सर्वाधिक धावा पवन रत्नायकेने केल्या. त्याने २२ चेंडूत ४० धावा केल्या. ज्यामध्ये ५ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. श्रीलंकेची फलंदाजी पाहून ते २०० पार जातील असे वाटत होते, मात्र इंग्लंडच्या गोलंदाजांनी वेळीच त्यांना रोखले.

याआधीच इंग्लंडने श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिकाही जिंकली असून आता टी२० मालिकाही जिंकत श्रीलंकेला घरच्याच मैदानावर निराश केले आहे. मालिकेतील तिसरा टी२० सामना ३ फेब्रुवारीला खेळला जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---