भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना शनिवारी, 27 जुलै रोजी पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज कामिंडू मेंडिसने दोन्ही हातांनी गोलंदाजी करत क्रिकेट जगताला चकित केले. मेंडिसने सूर्यकुमार यादवला डाव्या हाताने तर ऋषभ पंतला उजव्या हाताने गोलंदाजी केली.
श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज उजव्या हाताच्या फलंदाजाला डाव्या हाताने आणि डाव्या हाताच्या फलंदाजाला उजव्या हाताने गोलंदाजी करत होता. या सामन्यात मेंडिसने केवळ एकच षटक टाकले. मात्र, अवघ्या एका षटकात तो चर्चेचा विषय ठरला. कमिंडू मेंडिसने पहिल्या डावातील 10वे षटक टाकले. त्याच्या ओव्हरमध्ये त्याने 9 धावा दिल्या. मेंडिसने दोन्ही हातांनी गोलंदाजी केल्याची घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
I just saw this bowler Kamindu Mendis bowling from both arms in an international match.
At first, I thought I was hallucinating…#INDvsSL pic.twitter.com/rIuSyOUdF6— Asur (@IdleSid) July 27, 2024
सामन्याबाबत बोलायचे म्हणले तर, टीम इंडियाने टी20 मालिकेतील पहिला सामना 43 धावांनी जिंकला होता. पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने 20 षटकांत 7 विकेट गमावत 213 धावा केल्या. कर्णधार सूर्यकुमार यादवने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली. त्याने 26 चेंडूत 58 धावा केल्या. यादरम्यान त्याने 8 चौकार आणि 2 षटकार मारले. सूर्याशिवाय रिषभ पंतने शानदार खेळी केली. पंतने 33 चेंडूंत 6 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 49 धावा केल्या.
त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 19.2 षटकांत 170 धावांत सर्वबाद झाला. श्रीलंकेसाठी पथुम निसांकाने 48 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 79 धावांची खेळी केली. याशिवाय कुसल मेंडिसने 27 चेंडूंत 7 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 45 धावा केल्या होत्या. इतर सर्व फलंदाज फ्लॉप ठरले. संघाचे एकूण 7 फलंदाज दुहेरी आकडाही पार करू शकले नाहीत. 7 पैकी 4 फलंदाजांचे खातेही उघडले नाही.
हेही वाचा-
सूर्यकुमार यादवला ‘SKY’ बनवणारा खेळाडू कोण? सूर्यानं केला मोठा खुलासा!
काय सांगता? टी20 चा खरा किंग तर सूर्या, एकदा पाहाच नव्या कर्णधाराचा हा भीम पराक्रम
आज फायनलमध्ये धडकणार भारत आणि श्रीलंका! कुठे आणि कधी पाहायचा सामना?