श्रीलंका क्रिकेट एकदिवसीय मालिकेमध्ये नवीन सुरुवात करण्याची तयारी चालू आहे. त्याकरिता संघात नवीन कर्णधार आणि उपकर्णधार यांची नियुक्ती केली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने 18 खेळाडूंचा संघ घोषित केला आहे. बांग्लादेश विरुद्धच्या मालिकेसाठी हा संघ जाहीर करण्यात आला आहे. यष्टीरक्षक आणि फलंदाज कुसल परेरा याला काही महिन्यांपूर्वीच संघामधून काढण्यात आले होते. परंतु आता त्यालाच नवीन कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. कुसल परेराची आता दिमुथ करुणारत्नेच्या जागी कर्णधार म्हणून नियुक्ती झाली आहे.
वेस्ट इंडीजच्या विरुद्ध एकदिवसीय मालिकेतील तीन सामने हरल्यानंतर कर्णधार दिमुथ करुणारत्नेच्या संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्याचप्रमाणे संघातील एजेओ मैथ्यूज, दिनेश चंडीमल आणि लाहिरू थिरीमने या वरिष्ठ खेळाडूंच्या स्थानावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले. तसेच असेही म्हंटले जाते की, थिसारा परेराने वय वर्ष 32 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला कारण संघात त्याचा स्थानावर अडचणी निर्माण झाल्या होत्या.
आता या सर्व वरिष्ठ खेळाडूंना बांग्लादेश विरुद्धच्या मालिकेसाठी संघात जागा मिळाली नाही. काही दिवसांपूर्वीपासूनच दिमुथ करुणारत्नेला एकदिवसीय मालिका संघाच्या कर्णधार पदावरून दूर करण्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. 2019 विश्वचषकच्या अगोदर करुणारत्नेला एकदिवसीय मालिकेचा कर्णधार केले होते. कारण त्याचा नेतृत्वाखाली श्रीलंकेने कसोटी मध्ये उत्तम कामगिरी केली होती. मात्र आता बांगलादेश विरुद्ध कसोटी सामन्यानंतर करुणारत्नेला एकदिवसीय मालिका कर्णधार पदावरून बाहेर करण्यात आले आहे.
दरम्यान, २६ वर्षीय कुशल मेंडिसला उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. २०२३च्या वर्ल्डकपला ध्यानात घेऊन ही निवड केल्या गेली आहे. श्रीलंकेने या संघात नवीन खेळाडूंना देखील संधी दिली असून त्यांना आपले कौशल्य सिद्ध करण्याची या दौऱ्यात संधी मिळेल.
श्रीलंकेचा संघ – कुसल परेरा (कर्णधार), कुसल मेंडिस (उपकर्णधार), दनुष्का गुनाथिलाका, पाथुम निसांका, धनंजय डी सिल्वा, एशेन बंडारा, निरोशन डिकवेला, दासुन शनाका, इसुरु उडाना, दुश्मंथ चमीरा, रमेश मेंडिस, लक्षण संदाकन, अकिला धनंजय, वनिंदु हसरंग, चमिका करुणारत्ने, असिथ फर्नांडो, बिनुरा फर्नांडो, शिरान फर्नांडो
महत्त्वाच्या बातम्या-
या मैदानावर होतील भारत विरूद्ध श्रीलंकेचे सामने
एकाच वेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार भारताचे दोन संघ, पाहा यापूर्वी केव्हा घडले आहे असे
सुशीलमुळे कुस्ती क्षेत्राची नाचक्की, कुस्ती महासंघाची त्या घटनेवर मोठी प्रतिक्रिया