श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुवान कुलसेकराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. तो श्रीलंकेचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा चामिंडा वास आणि लसिथ मलिंगा नंतरचा तिसऱ्या क्रमांकाचा वेगवान गोलंदाज आहे.
37 वर्षीय कुलसेकराने 15 वर्षाच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 184 वनडे सामन्यात 199 विकेट्स, 58 टी20 सामन्यात 66 विकेट्स आणि 21 कसोटी सामन्यात 48 विकेट्स घेतल्या आहेत.
कुलसेकराने श्रीलंकेकडून 18 नोव्हेंबर 2003 ला इंग्लंडविरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तसेच तो श्रीलंकेकडून शेवटचा वनडे सामना झिम्बाब्वे विरुद्ध 10 जूलै 2017 ला खेळला. हा त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला आहे.
श्रीलंकेने 2014 ला मिळवलेल्या टी20 विश्वचषक विजयात कुलसेकराने महत्त्वाचा वाटा उचलला होता. त्याने या विश्वचषकात 6 सामन्यात 8 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच कुलसेकरा 2009 मध्ये आयसीसीच्या क्रमवारीत अव्वल क्रमांरावर आला होता.
विशेष म्हणजे 2011 च्या विश्वचषकातील अंतिम सामन्यात एमएस धोनीने मारलेला विजयी षटकार हा कुलसेकराच्या गोलंदाजीवर मारला होता. त्यामुळे कुलसेकरा भारतीय चाहत्यांच्या नेहमीच लक्षात रहातो.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–प्रो कबड्डीत हा मोठा पल्ला पार करणारा तेलुगू टायटन्स केवळ दुसराच संघ
–टेस्ट चॅम्पियनशीप: टीम इंडिया ७ क्रमांकाच्या जर्सीबाबत घेणार हा निर्णय?






