सध्या श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान वनडे मालिका खेळली जात आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना रविवारी (4 मे) खेळला गेला. हंबनटोटा येथे झालेल्या या सामन्यात यजमान श्रीलंका संघाने अफगाणिस्तानवर 132 धावांनी विजय मिळवला. पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर श्रीलंकेच्या या विजयात वनिंदू हसरंगा व धनंजया डी सिल्वा यांनी महत्त्वाचे योगदान दिले.
उभय संघातील पहिल्या सामन्यात श्रीलंका संघाला पराभव पत्करावा लागला होता. या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दसुन शनाका याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय सर्वच फलंदाजांनी योग्य ठरवला. दिमुथ करूणारत्ने (43) व पथुम निसंका (52) या जोडीने संघाला 82 धावांची सलामी दिली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कुसल मेंडिस याने 78 धावांची खेळी केली. त्यानंतर सदिरा समीरविक्रमा याने 44 धावा केल्या. डी सिल्वा व शनाका यांनी अनुक्रमे 29 आणि 23 धावा करून संघाला 323 पर्यंत पोहोचवले.
या धावांचा पाठलाग करताना रहमानुल्लाह गुरबाज केवळ 2 धावांवर बाद झाला. इब्राहिम झादरान (54) व रहमत शाह (36) यांनी अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर कर्णधार शाहिदी याने देखील अर्धशतक पूर्ण केले. मात्र, त्यानंतर ओमरझाई वगळला इतर कोणालाही दुहेरी धावसंख्या उभारता आली नाही. यासह त्यांचा डाव 191 धावांवर संपुष्टात आला. श्रीलंकेसाठी हसरंगा व डि सिल्वा यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले. डि सिल्वा याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
(Srilanka Beat Afghanistan By 132 Runs In 2nd ODI Hasranga And De Silva Shines)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कोण म्हणतंय ‘सुपरस्टार’, तर कुणी विराटच्या कव्हर ड्राईव्हच्या प्रेमात! कांगारुंकडून ‘किंग’ कोहलीचं कौतुक
भारतासाठी 7 वर्षांपासून खेळतोय, 212 विकेट्सही नावावर, पण कधीच खेळला नाही कसोटी सामना; तो खेळाडू कोण?