---Advertisement---

श्रीलंकेचे सिंह विश्वचषकातही दहाडले! आयर्लंडला मात देत केली सुपर 12 मध्ये विजयी सुरुवात

On: रविवार, ऑक्टोबर 23, 2022 12:58 PM
---Advertisement---

टी20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीतील तिसरा सामना अ गटातील आयर्लंड आणि श्रीलंका (SLvIRE) यांच्या दरम्यान खेळला गेला. श्रीलंकेने या सामन्यात शानदार गोलंदाजी करत आयर्लंडला केवळ 128 धावांवर रोखले. त्यानंतर श्रीलंकेने केवळ एक गडी गमावत विजयी लक्ष पार केले. या विजयासह श्रीलंकेने विश्वचषक मोहिमेचा शुभारंभही केला. शानदार अर्धशतकी खेळी करणारा कुसल मेंडिस सामन्याचा मानकरी ठरला.

 

पात्रता फेरीतून पुढे आलेल्या आयर्लंड व श्रीलंका यांच्यातील हा सामना होबार्ट येथे रंगला. श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय योग्य ठरला. कर्णधार बालबर्नी केवळ एक धाव करून बाद झाला. तर टकर 10 धावांच्या पुढे जाऊ शकला नाही. वेस्ट इंडीजविरुद्धच्या ऐतिहासिक विजयाचा नायक ठरलेला पॉल स्टर्लिंग याने 34 धावांचे योगदान दिले. युवा हॅरी टेक्टर याने संघासाठी सर्वाधिक 45 धावा केल्या. मात्र, इतर फलंदाज श्रीलंकेच्या गोलंदाजांचा सामना करू शकले नाहीत. परिणामी त्यांचा संघ निर्धारित 20 षटकात केवळ 8 बाद 148 धावा काढू शकला. श्रीलंकेसाठी महिश तिक्षणा व वनिंदू हसरंगा या दोन्ही फिरकीपटूंनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.

विजयासाठी मिळालेल्या धावसंख्येचा पाठलाग करताना नियमित सलामीवीर पथुम निसंकाच्या अनुपस्थितीत खेळत असलेल्या श्रीलंकेसाठी धनंजय डी सिल्वा व कुसल मेंडीस यांनी शानदार सलामी दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी 63 धावा जोडल्या. डी सिल्वा 31 धावा करून बाद झाल्यानंतर उतरलेल्या चरिथ असलंकाने मेंडीसला योग्य साथ दिली. दोघांनी आयर्लंडला आणखी एकही यश न मिळू देता 9 गडी राखून विजय संपादन केला. मेंडिसने नाबाद 68 तर असलंकाने 31 धावा केल्या. या विजयासह श्रीलंका अ गटातील गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान वेगळाचं! भारतावर पडलायं भारी, एकदा आकडेवारी पाहाच
‘त्यांनी चांगली गोलंदाजी केली’, अफगाणिस्तानला पराभूत केल्यानंतर त्यांच्या बॉलर्सचे बटलरकडून कौतुक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---