झिम्बाब्वे येथे सुरू असलेल्या 2023 वनडे विश्वचषक क्वालिफायर्स स्पर्धेत सुपर सिक्स फेरीत श्रीलंकेने आपले विजय अभियान सुरू ठेवले. बुलावायो येथे झालेल्या नेदरलँड्स विरुद्धच्या सामन्यात 21 धावांनी विजय मिळवत त्यांनी विश्वचषकात पात्रता मिळवण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले. अष्टपैलू धनंजया डी सिल्वा व महिश तिक्षणा हे श्रीलंकेच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
Back on 🔝
Sri Lanka reclaim the No.1 spot in the Super Six Standings and are on the verge of booking their #CWC23 berth 🤩 pic.twitter.com/xguonyspVO
— ICC (@ICC) June 30, 2023
बुलावायो येथे झालेल्या या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दसुन शनाका याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पात्रता फेरीच्या पहिल्या फेरीत वेस्ट इंडीजला पराभूत करणाऱ्या नेदरलँड्सने या सामन्यातही भेदक गोलंदाजी करताना श्रीलंकेला चांगलेच त्रस्त केले. वॅन बीक याच्या नेतृत्वात खेळत असलेल्या नेदरलँड्सच्या गोलंदाजांनी श्रीलंकेच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर टिकू दिले नाही. नियमित अंतराने त्यांनी त्यांचे बळी मिळवले. अवघ्या 96 धावांवर श्रीलंकेचे सहा फलंदाज बाद झालेले.
संघ अडचणीत असताना अष्टपैलू धनंजय डी सिल्वा याने एक बाजू लावून धरत 93 धावांची संघर्षपूर्ण खेळी केली. हसरंगा व महिश तिक्षणा यांनी बहुमूल्य योगदान देत श्रीलंकेला 213 पर्यंत मजल मारून दिली. बीक व लीडे यांनी नेदरलँड्ससाठी प्रत्येकी तीन बळी मिळवले.
या धावांचा बचाव करताना श्रीलंकेच्या अनुभवी गोलंदाजांनी आपला दर्जा दाखवून दिला. सर्व गोलंदाजांनी योगदान देत बळी टिपले. अत्यंत कंजूस गोलंदाजी करत त्यांनी नेदरलँडचा डाव केवळ 191 धावांवर संपुष्टात आणला. नेदरलँडृस संघासाठी बारेसी व एडवर्ड यांनी अर्धशतके झळकावली. त्यांच्या व्यतिरिक्त लीडे याने 41 धावांची खेळी केली. श्रीलंकेसाठी तिक्षणाने तीन बळी मिळवले.
श्रीलंका सध्या सुपर सिक्स फेरीच्या सामन्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. आणखी एक विजय मिळवल्यास त्यांचे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकात स्थान नक्की होईल.
(Srilanka Beat Netherlands In 2023 ODI World Cup Qualifiers)
महत्वाच्या बातम्या-
अश्विनकडून पाकिस्तानच्या बॉलिंग अटॅकचं कौतुक, स्पिनर्सची खाण असलेल्या ‘या’ संघाकडून उलटफेरची अपेक्षा
MPL 2023 गाजवलेले टॉप फाईव्ह धुरंधर! क्रिकेटजगताला घ्यायला लावली आपली दखल