जागतिक क्रिकेटमध्ये जेव्हाही विस्फोटक फलंदाजांची चर्चा होते, तेव्हा त्यामध्ये दक्षिण आफ्रिका संघाच्या खेळाडूंचे नाव हमखास घेतले जाते. त्यात माजी खेळाडू एबी डिविलियर्स आणि फाफ डू प्लेसिस यांसारख्या दिग्गजांचा समावेश होतो. डिविलियर्स त्याच्या फलंदाजीमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. त्याने अनेकदा आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. नुकतेच त्याने माजी संघसहकारी फाफबाबत मोठा खुलासा केला.
काय म्हणाला डिविलियर्स?
एबी डिविलियर्स (AB De Villiers) याने फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) याच्याविषयी खुलासा करत म्हटले की, तो शाळेच्या दिवसांमध्ये खूप आळशी होता. त्याने स्वत:विषयी हेही सांगितले की, तो आपल्या अभ्यासावर लक्ष द्यायचा. माध्यमांशी बोलताना त्याला विचारण्यात आले की, ज्यावेळी तू शाळेत होता, तेव्हा तू सर्व गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचा. फाफच्या पुस्तकानुसार, तू असा व्यक्ती होता, ज्याने प्रत्येक गोष्टीत यश मिळवले होते. तू अभ्यासातही हुशार होता, तू तीन किंवा चार वेगवेगळ्या खेळांमध्येही पारंगत होता. तसेच, पूर्णपणे प्रत्येक गोष्टीवर लक्ष द्यायचा.
‘त्याला पूर्ण दिवस क्रिकेटच्या मैदानावर राहायचे होते’
या प्रश्नाचे उत्तर देताना डिविलियर्स म्हणाला की, “फाफचे हे म्हणणे मजेशीर आहे. मी गरजेचा नव्हतो. तो खूप खूपच आळशी होता. त्याला शाळेचे काम बिल्कुल आवडत नव्हते. त्याला फक्त दिवसभर क्रिकेटच्या मैदानावर राहायचे होते. तसेच, मुलांसोबत रग्बी खेळू वाटायचे.”
पुढे बोलताना डिविलियर्स म्हणाला की, “मी कधीही कोणत्या गोष्टीला जाऊ देऊ शकत नव्हतो. शाळेतील काम मजेशीर होते. हे महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे जितका मला खेळ आवडायचा, मला माहिती होते की, पुस्तकांसमोर वेळ घालवणे माझ्या जबाबदारीचा भाग होता.”
डिविलियर्सने पुढे असेही म्हटले की, “जिथपर्यंत अभ्यासाची बाब आहे, तर मी शाळेत पहिल्या 10मध्ये नव्हतो. मात्र, मी याची खात्री केली की, मी आपल्या शाळेवरही लक्ष देईल. हे माझ्यासाठी महत्त्वाचे होते. माझ्या आयुष्यात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळी मानकं आहेत. जर मी यामध्ये काहीही जाऊ दिले, तर मी स्वत:चा द्वेष करेल. मी परिपूर्ण नाहीये, परंतु आयुष्यातील वेगवेगळ्या क्षेत्रांबाबत खात्री करण्याची जबाबदारी माझ्यासाठी महत्त्वाची आहे.”
एबी डिविलियर्सची कारकीर्द
डिविलियर्सने त्याच्या कारकीर्दीत दक्षिण आफ्रिका संघाकडून 114 कसोटी, 228 वनडे आणि 78 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने 50.66च्या सरासरीने 8765 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने 22 शतके, 2 द्विशतके आणि 46 अर्धशतके झळकावली आहेत. याव्यतिरिक्त वनडेत त्याने 53.5च्या सरासरीने 9577 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने 25 शतके आणि 53 अर्धशतके केली आहेत. तसेच, टी20त त्याने 26.12च्या सरासरीने 1672 धावा केल्या आहेत. यामध्ये 10 अर्धशतके केली आहेत. (ab de villiers big revelation about faf du plessis know here)
महत्वाच्या बातम्या-
MPL मधून मिळाली महाराष्ट्राची ‘यंग ब्रिगेड’! भविष्यात ठोठावतील टीम इंडियाचे दार
अश्विनकडून पाकिस्तानच्या बॉलिंग अटॅकचं कौतुक, स्पिनर्सची खाण असलेल्या ‘या’ संघाकडून उलटफेरची अपेक्षा