झिम्बाब्वे येथे सुरू असलेल्या 2023 वनडे विश्वचषक क्वालिफायर्स स्पर्धेत शुक्रवारी (23 जून) श्रीलंका विरुद्ध ओमान असा सामना खेळला गेला. श्रीलंकेने या सामन्यात एकतर्फी वर्चस्व गाजवताना 10 गड्यांनी दणदणीत विजय साजरा केला. ओमानने दिलेले 99 धावांचे आव्हान श्रीलंकेच्या सलामीवीरांनी अवघ्या पंधरा षटकात पूर्ण केले. अष्टपैलू हसरंगाने स्पर्धेत दुसऱ्यांदा पाच बळी आपल्या नावे केले.
A huge victory and a big net run rate boost for Sri Lanka 😍#CWC23 | 📝 #SLvOMA: https://t.co/WW89IfdKiS pic.twitter.com/BNyOyzX126
— ICC (@ICC) June 23, 2023
बुलावायो येथे झालेल्या या सामन्यात ओमान संघाला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. श्रीलंकेच्या वेगवान गोलंदाजांपुढे त्यांचे पहिले चार फलंदाज केवळ वीस धावांमध्ये तंबूत परतले. त्यानंतर जतिन्दर सिंग व आयान खान यांच्या दरम्यान 52 धावांची भागीदारी झाली. हसरंगाने 21 व्या षटकात तीन गडी बाद करत ओमानचा डाव घसरवला. त्यानंतर आणखी दोन बळी मिळवत त्याने ओमानला 98 धावांवर गुंडाळले. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचे सलामीवीर पथुम निसंका व दिमुथ करूणारत्ने यांनी अनुक्रमे 37 व 61 धावा करत पंधरा षटकांमध्ये संघाला विजय मिळवून दिला.
दिवसातील दुसऱ्या सामन्यात स्कॉटलंड संघाने युएईचा 111 धावांनी धुव्वा उडवला. रिची बॅरिंग्टन याने झळकावलेल्या शतकामूळे स्कॉटलंडने 282 धावा उभारल्या. त्यानंतर सफयान शरिफने 4 व ख्रिस सोलने 3 बळी मिळवत युएईचा डाव 171 धावांवर संपुष्टात आणला. यासह स्कॉटलंड संघाने सलग दुसरा विजय नोंदवला.
(Srilanka Beat Oman By 10 Wickets In ODI World Cup Qualifiers Hasranga Takes 5 Wickets)
महत्वाच्या बातम्या –
BREAKING: ऑस्ट्रेलियन क्रिकेटवर शोककळा! दिग्गज क्रिकेटपटूने घेतला अखेरचा श्वास
वेस्ट इंडिजविरुद्धच्या टीम इंडियात दिसतोय भविष्यातील भारतीय संघ! पुढील 5 वर्षाची तयारीच सुरू