---Advertisement---

ASIA CUP: पथिराना-थिक्षणापुढे बांगलादेशने टेकले गुडघे! श्रीलंकेसमोर विजयासाठी 165 धावांचे आव्हान

---Advertisement---

आशिया चषक 2023 मधील दुसरा सामना श्रीलंका व बांगलादेश यांच्या दरम्यान खेळला गेला. पल्लेकल येथे झालेल्या या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, सोळंकेच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून नियंत्रित गोलंदाजी करत बांगलादेशला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. त्यामुळे बांगलादेशचा डाव केवळ 42.4 षटकात 164 धावांवर संपुष्टात आला. श्रीलंकेसाठी युवा वेगवान गोलंदाज मथिशा पथिराना याने सर्वाधिक चार बळी मिळवले.

प्रमुख खेळाडूंच्या दुखापतींमुळे युवा खेळाडूंना मैदानात घेऊन उतरलेल्या श्रीलंकेने नाणेफेक गमावल्यानंतरही सामन्यावर पहिल्यापासून पकड बनवली. तंझीम हसन हा खातेही न खोलता तंबूत परतला. त्यानंतर कर्णधार शाकीब केवळ पाच धावा करू शकला. इतरही फलंदाज केवळ चांगली सुरुवात मिळाल्यानंतरही पंधरा-वीस धावांच्या पुढे जाऊ शकले नाहीत. असे असताना शांतो याने एकहाती किल्ला लढवला. त्याने अर्धशतक झळकावले.

तळातील फलंदाज फारसा प्रतिकार न करू शकल्याने बांगलादेशचा डाव केवळ 164 धावांवर संपुष्टात आला. शांतोने सर्वाधिक 89 धावा बनवल्या. श्रीलंकेसाठी युवा वेगवान गोलंदाज मथिशा पथिराना याने सर्वाधिक चार बळी मिळवले. तर महिश थिक्षणा याने अत्यंत नियंत्रित गोलंदाजी करताना 19 धावा देत दोन फलंदाज गारद केले. डिसिल्वा, वेललागे व शनाका यांनी प्रत्येकी एक बळी आपल्या नावे केला.

(Srilanka Clinical Bowling Performance Bangaladesh All Out On 164 Pathirana And Theekshana Bowl Well)

हेही वाचाच-
‘हे थोडे कठीण…’, रक्षाबंधनच्या खास क्षणी हळहळली शुबमनची बहीण; तुम्हीही व्हाल भावूक
भारताचा माजी खेळाडू बाबरच्या शतकावर फिदा; म्हणाला, ‘त्याची फलंदाजी डोळ्यांना सुखावणारी…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---