मायदेशात न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचा एकतर्फी पराभव झाल्यानंतर सध्या सुरू असलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2023-25 मध्ये अंतिम फेरी गाठण्याची घोडदौड खूपच रंजक बनली आहे. ज्यात आता श्रीलंकेचा संघ तसेच विजेतेपदाच्या सामन्यात स्थान निर्माण करण्याची संधी आहे. सध्या डब्ल्यूटीसीच्या पॉइंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या स्थानावर आहे. टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर आहे. तर श्रीलंका संघ सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. एकीकडे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 नोव्हेंबरपासून 5 सामन्यांची बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका सुरू होणार आहे. तर श्रीलंकेच्या संघालाही नोव्हेंबरच्या अखेरीस दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. ज्याआधी त्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.
श्रीलंका क्रिकेटने दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू नील मॅकेन्झीला आपल्या कोचिंग स्टाफचा एक भाग बनवले आहे. ज्यामध्ये या मालिकेतील 2 सामन्यांसाठी त्याची श्रीलंका संघाचे सल्लागार प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही माहिती श्रीलंका क्रिकेटने जारी केलेल्या अधिकृत निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.
यावेळी सीईओ ऍशले डी सिल्वा म्हणाले की, नील मॅकेन्झी यांना दक्षिण आफ्रिकेतील परिस्थितीची चांगली माहिती आहे. ज्यामुळे आमच्या संघाला फायदा होईल जेणेकरून ते तेथील परिस्थितीनुसार स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे जुळवून घेऊ शकतील. त्याच्याकडे फलंदाज म्हणूनही भरपूर अनुभव असून त्याचा फायदा संघातील खेळाडूंनाही होणार आहे. नील मॅकेन्झीने दक्षिण आफ्रिकेसाठी 58 कसोटी सामने खेळले आहेत ज्यात त्याने 37.39 च्या सरासरीने 3523 धावा केल्या आहेत.
2023-25 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या शर्यतीत दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी श्रीलंकेविरुद्धची आगामी 2 सामन्यांची कसोटी मालिका देखील खूप महत्त्वाची आहे. श्रीलंकेचा संघ सध्या 55.56 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ 52.56 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. या मालिकेतील पहिला सामना 27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान डर्बन येथील किंग्समीड स्टेडियमवर, तर दुसरा सामना 5 ते 9 डिसेंबर दरम्यान गकेबरहा येथील सेंट जॉर्ज पार्क येथे खेळवला जाईल.
हेही वाचा-
IND vs SA: तिसऱ्या टी20 मध्ये सेंच्युरियनची खेळपट्टी घातक? जाणून घ्या कोणाला मिळणार फायदा!
VIDEO: बाॅर्डर-गावसकर मालिकेपूर्वी भारतीय संघ पर्थच्या मैदानावर गाळतोय घाम
भारताचा चॅम्पियन खेळाडू बनला दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाजी प्रशिक्षक…!