भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात नुकत्याच पार पडलेल्या टी-२० मालिकेत श्रीलंका संघाने २-१ ने विजय मिळवला आहे. यापूर्वी इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या वनडे आणि टी-२० मालिकेत श्रीलंका संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. दरम्यान श्रीलंका संघातील ३ खेळाडूंनी बायो बबलचे उल्लंघन केले होते. त्यामुळे या खेळाडूंवर मोठी कारवाई करण्यात येऊ शकते.
या प्रकरणाबाबत आता श्रीलंका क्रिकेटने ५ सदस्यीय शिस्तपालन समितीद्वारे चौकशी केली आहे. या चौकशीच्या आधारे एक न्यायाधीश असलेल्या ५ सदस्यीय समितीने हे खेळाडू दोषी असल्याचे म्हटले आहे. त्यांनी नियम मोडणाऱ्या दोन खेळाडू धनुष्का गुणथीलका आणि कुसल मेंडिस यांना २ वर्षांसाठी निलंबित करण्याची आणि यष्टिरक्षक फलंदाज निरोशन डिकवेलाला १८ महिन्यासाठी निलंबित करण्याची मागणी केली गेली आहे.
श्रीलंकेच्या या तीनही खेळाडूंनी इंग्लंड दौऱ्यावर असताना बायो बबलच्या नियमांचे उल्लंघन केले होते. जगभरात कोरोनाचे सावट पसरले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सामने हे कठोर बायो बबलचे पालन करून खेळवले जात आहेत. या खेळाडूंनी बायो बबलचे नियम तोडल्यामुळे सर्वांच्या चिंतेत वाढ झाली होती. ही चूक केल्यामुळे त्यांच्यावर २५,००० डॉलर्सचा दंड देखील आकारण्यात आला होता. या तिन्ही खेळाडूंनी जून महिन्यात झालेल्या इंग्लंड संघाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे साम्यन्यापूर्वी बायो बबलच्या नियमांचे उल्लंघन केले होते. (Srilanka Cricket displinary committee recommends two year bans for dhanushka gunatilaka and kusal Mendis)
या तिन्ही खेळाडूंना त्याचवेळी संघाबाहेर करण्यात आले होते. इतकेच नव्हे तर त्यांना त्याचवेळी मायदेशी पाठवण्यात आले होते. तसेच भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात पार पडलेल्या वनडे आणि टी-२० मालिकेसाठी या खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले नव्हते.
महत्त्वाच्या बातम्या-
द्रविड घेणार का भारताचे मुख्य प्रशिक्षक शास्त्री यांची जागा? ‘द वॉल’ने दिले उत्तर
बिग ब्रेकिंग! पराभवानंतर धवनसेनेला आणखी मोठा धक्का; चहलसह ‘हा’ खेळाडू पॉझिटिव्ह
निर्णायक सामन्यात संजू सॅमसन भोपळाही न फोडता बाद, नेटकऱ्यांनी केले भरपूर ट्रोल