---Advertisement---

श्रीलंका-भारत मालिकेआधी ‘हा’ दिग्गज घेऊ शकतो निवृत्ती

On: बुधवार, जुलै 7, 2021 3:52 PM
---Advertisement---

शिखर धवनच्या नेतृत्वात श्रीलंका दौऱ्यावर गेलेला भारतीय संघ १३ तारखेपासून आपल्या अभियानाला सुरुवात करेल. भारतीय संघ या दौऱ्यावर तीन वनडे व तीन टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी श्रीलंका आपला सर्वोत्तम संघ की दुय्यम संघ उतरवतो हे अजूनही निश्चित झाले नाही. याच दरम्यान श्रीलंका क्रिकेटच्या गोटातून एक महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे. श्रीलंकेचा एक दिग्गज क्रिकेटपटू लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करू शकतो.

हा खेळाडू करू शकतो निवृत्तीची घोषणा
भारताविरुद्धच्या मालिकेसाठी आठवडाभराचा कालावधी शिल्लक असून अजूनही श्रीलंका क्रिकेट बोर्ड व खेळाडूंमधील कराराचा वाद मिटू शकला नाही. त्याचवेळी श्रीलंकेचा माजी कर्णधार व अनुभवी अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूज हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या बातमीनुसार तो याबाबतची घोषणा लवकरच सार्वजनिकरित्या करू शकतो. श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या नव्या करारास मॅथ्यूज यानेदेखील विरोध दर्शवला आहे.

अशी राहिली आहे कारकीर्द
श्रीलंकेचा माजी कर्णधार राहिलेला ३४ वर्षीय मॅथ्यूज श्रीलंकासाठी आत्तापर्यंत ९० कसोटी, २१८ वनडे व ७८ टी२० सामने खेळला आहे. यामध्ये त्याच्या नावे १३ हजारपेक्षा जास्त धावा व २०० बळी आपल्या नावे केले आहेत. आपल्या अष्टपैलू कामगिरीने त्याने संघाचा अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले. त्याची कारकीर्द दुखापतींच्या विळख्यात सापडली. त्याने आपला अखेरचा कसोटी सामना एप्रिल २०२० मध्ये खेळला.

श्रीलंका क्रिकेटची दुर्दशा
सध्या श्रीलंका क्रिकेट अत्यंत वाईट स्थितीतून जात आहे. संघाची मैदानावरील कामगिरी कमालीचे घसरली असून त्यांना ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी थेट पात्रताही मिळवता आली नाही. इंग्लंड दौऱ्यावर असताना तीन खेळाडूंना बेशिस्तीच्या कारणामुळे एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले. तसेच खेळाडू व क्रिकेट बोर्डातील कराराचा वाद मागील काही महिन्यांपासून तसाच आहे. श्रीलंकेच्या या कामगिरीवर अनेक आजी-माजी क्रिकेटपटू नाराजी व्यक्त करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

दिलीप कुमार यांनी बीसीसीआयकडे केली होती ‘या’ खेळाडूची शिफारस, पुढे त्याने भारताला बनवले विश्वविजेता

‘ती’ गोष्ट घडली नसती तर टीम इंडियाला धोनी कधी भेटलाच नसता

मोकळे आकाश, हातात हात आणि धबधब्याखाली ईशांतचा पत्नीसंगे रोमान्स; पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---