---Advertisement---

सीएसकेच्या संकटात दुहेरी वाढ! ज्या खेळाडूमुळे झाले होते बॉयकॉट सीएसके ट्रेंड, त्यानेच केली आहे अशी कामगिरी

Maheesh-Theekshana
---Advertisement---

एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने आतापर्यंत आयपीएल स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. या संघाने ४ वेळेस जेतेपदावर नाव कोरले आहे. तसेच आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात या संघाने २१ खेळाडूंना आपल्या संघात स्थान दिले आहे. तर लिलाव होण्यापूर्वी या संघाने ४ खेळाडूंना रिटेन केले होते. तसेच श्रीलंकेचा फिरकीपटू महिश थीकशानाला (Maheesh Theekshana)देखील ७० लाखांची बोली लावत या संघात स्थान देण्यात आले आहे. परंतु तमिळ लोकांनी त्याला संघात स्थान दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. इतकेच नव्हे तर सोशल मीडियावर बॉयकॉट सीएसके ट्रेंड होऊ लागले होते. दरम्यान त्याच खेळाडूने आता अप्रतिम कामगिरी केली आहे.

ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ५ टी२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या तीनही सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने विजय मिळवत ३-० ची विजयी आघाडी घेतली आहे. परंतु तिसऱ्या सामन्यात देखील महिश थीकशानाने अप्रतिम कामगिरी केली होती. त्याने २४ धावा खर्च करत ३ गडी बाद केले होते. यासह टी२० क्रिकेटमध्ये त्याने ५० गडी बाद करण्याचा टप्पा देखील ओलांडला आहे. त्याने हा कारनामा ४५ व्या डावात केला आहे.

मोठी धावसंख्या उभारण्यात श्रीलंका संघ अपयशी 

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंका संघाला ६ गडी बाद अवघ्या १२१ धावा करण्यात यश आले. यामध्ये कर्णधार दासून शनाकाने सर्वाधिक ३९ धावांची खेळी केली. तर सामना सुरू होण्यापूर्वीच श्रीलंका संघाला मोठा धक्का बसला होता. मुख्य गोलंदाज आणि फिरकीपटू वनिंदू हसरंगाला कोरोनाची लागण झाल्यामुळे संघाबाहेर राहावे लागले होते.

ऑस्ट्रेलिया संघाकडून गोलंदाजी करताना केन रिचर्डसनने २१ धावा खर्च करत ३ गडी बाद केले. तर ऑस्ट्रेलियाने फलंदाजी करताना दिलेले आव्हान अवघ्या १६.५ षटकात पूर्ण केले. ऑस्ट्रेलिया संघाकडून ग्लेन मॅक्सवेलने ३९ आणि आरोन फिंचने ३५ धावा केल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या :

पंगा घ्यायचा नाही!! मिताली राजवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या ब्रिटिश समलोचकाला वीआर वानिताने दिले जोरदार प्रत्युत्तर

आनंदाला नाही तोटा! आयपीएल लिलावात १० कोटींची बोली लागल्याने विंडीजच्या खेळाडूने दिली ‘एवढ्या’ रकमेची पिझ्झा पार्टी

आज ईडन गार्डन्सवर रंगणार भारत – वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला टी२० सामना, ‘अशी’ असू शकते प्लेइंग ११

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---