पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका संघात विश्वचषक 2023 स्पर्धेतील 8 वा सामना खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर श्रीलंकेच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली. कुसल मेंडीस व सदिरा समरविक्रमा यांनी झळकावलेल्या शतकांच्या जोरावर श्रीलंकेने 9 बाद 344 धावा उभारल्या. पाकिस्तान संघासाठी वेगवान गोलंदाज हसन अली याने सर्वाधिक चार बळी मिळवले.
या सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी लंकेकडून सलामीला पथुम निसांका आणि कुसल परेरा उतरले होते. मात्र, डावाच्या दुसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर हसन अली याने परेराला बाद केले. त्यानंतर कुसल मेंडिस व पथुम निसंका यांनी दुसऱ्या गड्यासाठी 102 धावांची भागीदारी केली. निसंका अर्धशतक करून बाद झाल्यावर चौथ्या क्रमांकावर सदिरा समरविक्रमा हा फलंदाजीला आला. या जोडीने पुन्हा एकदा शतकी भागीदारी करून श्रीलंकेला सामन्यात पुढे नेले.
मेंडिसने विश्वचषकातील आपले पहिले शतक पूर्ण केले. त्याने केवळ 77 चेंडूंमध्ये 122 धावांची तुफानी खेळी केली. दुसऱ्या बाजूने सदिरा समरविक्रमा याने देखील आपल्या वनडे कारकीर्दीतील पहिले शतक झळकावले. बाद होण्यापूर्वी त्याने 89 चेंडूंमध्ये 108 धावा बनवल्या. खालच्या फळीतील फलंदाजांमध्ये इतरांना मोठी धावसंख्या न करता आल्याने श्रीलंकेचा डाव 344 धावांपर्यंत सिमीत राहिला. पाकिस्तानसाठी हसन अली याने सर्वाधिक चार बळी मिळवले.
(Srilanka Post 344 Against Pakistan In ODI World Cup Kusal Mendis Sadeera Samarwickrama Hits Century)
हेही वाचा-
जाळ अन् धूर संगटच! मेंडिसने लंकेकडून पाकिस्तानविरुद्ध ठोकले वर्ल्डकपमधील वेगवान शतक, फक्त…
टोप्ली पुढे बांगलादेशची टॉप ऑर्डर गुडघ्यावर! तीनच षटकात केली वाताहात