भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. १३ जुलैपासून भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांमध्ये मर्यादित षटकांची मालिका खेळली जाणार आहे. तत्पुर्वी बांगलादेश आणि इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत पराभूत झाल्यानंतर श्रीलंकन संघाच्या चिंतेत वाढ होताना दिसून येत आहे. श्रीलंका संघाची ही आतापर्यंतची सर्वात खराब कामगिरी आहे. अशातच भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेत श्रीलंका क्रिकेट बोर्ड नवीन खेळाडूंना संधी देऊ शकतो.
श्रीलंकन संघाच्या निराशाजनक कामगिरीमुळे श्रीलंकन क्रिकेट बोर्डच्या चिंतेत वाढ झाली आहे. तसेच खेळाडू आणि बोर्ड यांच्यात केंद्रीय करारामुळे वाद देखील सुरू आहेत. मर्यादित षटकांची मालिका सुरु होण्यासाठी अवघे १० दिवस शिल्लक राहिले आहेत. तरीदेखील श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने आपला संघ जाहीर केला नाही.
यामागील मुख्य कारण हे आहे की, श्रीलंकन क्रिकेटपटूंनी अजूनपर्यंत केंद्रीय करारावर स्वाक्षरी केलेली नाही. असे म्हटले जात आहे की, ५ जुलैपर्यंत कुशल परेराच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघातील खेळाडूंनी स्वाक्षरी करण्यास नकार दिला. तर भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेत काही नवीन चेहरे खेळताना दिसू शकतात. (Ind vs SL : srilanka selector declare pick secosn string srilanka sqaud vs india in odi and T20 series, if central contract not sign)
श्रीलंकेचे स्थानिक वृत्तपत्र डेली एफटीतील वृत्तानुसार, निवड समितीचे अध्यक्ष प्रमोदा विक्रमासिंघे यांनी स्पष्ट केले आहे की, ‘जर भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेपूर्वी संघातील खेळाडूंनी स्वाक्षरी देण्यास नकार दिला. तर आमच्याकडे पर्यायी खेळाडू आहेत. ज्यांना संधी दिली जाईल. हे खेळाडू ३९ करारबद्ध खेळाडूंपैकी एक असतील जे इंग्लंड दौऱ्यावर श्रीलंका संघासोबत नव्हते.’
हे ३९ खेळाडू २ वेगवेगळ्या ठिकाणी कसून सराव करण्यात व्यस्त आहेत. यापैकी एका समूहाचे सराव सत्र भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेच्या ३ दिवसांपूर्वी समाप्त होणार आहे. जर संघातील खेळाडू आणि बोर्ड यांच्यात कराराबाबत कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही. तर या ३९ खेळाडूंपैकी काही खेळाडूंना भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेत संधी दिली जाईल.
याबाबत बोलताना निवडकर्ते म्हणाले की, “आम्ही भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी खेळाडूंचा विचार करत आहोत. आम्ही अजूनपर्यंत भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी संघाची घोषणा केली नाही.
महत्वाच्या बातम्या-
‘धोनी’च्या नावाने शिक्षकाच्या नोकरीसाठी अर्ज, ‘तेंडुलकर’ला बनवले वडील; अज्ञात व्यक्ती संकटात!
ऑस्ट्रेलियाच्या धाकड फलंदाजाचा मोठा निर्णय, ‘या’ टूर्नामेंटसाठी टी२० विश्वचषकावर करणार दुर्लक्ष
विक्रमतोड खेळीसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मितालीचे ‘राज्य’, बनली महिला क्रिकेटची ‘मास्टर ब्लास्टर’