सध्या श्रीलंका क्रिकेट संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील दुसरा व अखेरचा कसोटी सामना सोमवारी (20 मार्च) समाप्त झाला. वेलिंग्टन येथे झालेल्या या सामन्यात यजमान न्यूझीलंड संघाने एक डाव व 58 धावांनी मोठा विजय मिळवला. मालिकेतील पहिला सामनाही श्रीलंकेने गमावला होता. या क्लीन स्वीपनंतर श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करूणारत्ने याने नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला असून, त्याने याबाबतची कल्पना श्रीलंका क्रिकेट बोर्डाला दिली आहे.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी श्रीलंका संघाला हे दोन्ही सामने जिंकणे आवश्यक होते. पहिल्या सामन्यात श्रीलंकेने विजयासाठी आटोकाठ प्रयत्न केले. मात्र, पाचव्या दिवशीच्या अखेरच्या चेंडूवर त्यांना पराभूत व्हावे लागले होते. परंतु, दुसऱ्या सामन्यात श्रीलंका संघ अजिबात संघर्ष करू शकला नाही. परिणामी, संघाला 1 डाव व 58 धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला. या पराभवाची जबाबदारी घेत करूणारत्ने याने आपण संघाचे नेतृत्व सोडत असल्याची घोषणा केली. तो म्हणाला,
”या पराभवाची जबाबदारी घेत मी नेतृत्वाचा राजीनामा देत आहे. आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या आगामी कसोटी मालिकेनंतर मी संघाचा कर्णधार नसेल. पुढील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या सायकलसाठी श्रीलंका एका नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात तयार होईल. मी माझा निवड बोर्ड व निवडसमितीला सांगितला असून त्यांच्या प्रतिसादाची प्रतीक्षा आहे.”
करूणारत्ने याने कर्म्णधारपद सोडण्याची घोषणा केली असली तरी, बोर्डाकडून अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही. आगामी काळात श्रीलंका आयर्लंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ही मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग नसेल.
(Srilanka Test Captain Dimuth Karunaratne Resign He Announced His Last Assignment As Captain Against Ireland)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मी अस ऐकलंय की, ही धोनीची शेवटची आयपीएल आहे…’, कॅप्टन कूलविषयी काय म्हणाला शेन वॉटसन?
जेमिसनच्या जागी सिसांडा मगाला सीएसकेच्या ताफ्यात, जाणून घ्या नवख्या खेळाडूवर विश्वास दाखवण्याचे कारण