पुणे । पुणे जिल्हा परीषद सदस्य रोहित पवार यांच्या तर्फे आयोजित सृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत पै सचिन भाडळे प्रतिष्ठान वाघोली संघाने आर्या स्पोर्ट संघाचा 10 गडी राखून दणदणीत पराभव करत सृजन करंडक क्रिकेट स्पर्धेच्या चौथ्या पर्वाचे विजेतेपद पटकावले.
लिजेन्डस् क्रिकेट क्लब, मुंढवा येथे पार पडलेल्या या स्पर्धेत विजेतेपदासाठीच्या लढतीत आसिफ शेखच्या दमदार अष्टपैलू कामगिरीच्या बळावर पै. सचिन भाडळे प्रतिष्ठान वाघोली संघाने आर्या स्पोर्ट संघाचा 10 गडी राखून दणदणीत पराभव करत विजेतेपद पटकावले. नाणेफेक जिंकुन पै. सचिन भाडळे प्रतिष्ठान वाघोली संघाने पहिले क्षेत्ररक्षण स्विकारले. पहिल्यांदा खेळताना आसिफ शेखच्या अचूक गोलंदाजीने आर्या स्पोर्ट शिवसैनिक संघाचा डाव 6 षटकात 2 बाद 47 धावांत रोखला. यात बालाजी पवारने नाबाद 19 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. 47 धावांचे लक्ष आसिफ शेखच्या नाबाद 34 व स्वप्निल सातवच्या नाबाद 10 धावांच्या जोरावर पै. सचिन भाडळे प्रतिष्ठान वाघोली संघाने एकही गडी न गमावता केवळ 3.5 षटकात 48 धावांसह सहज पुर्ण करत विजेतेपद पटकावले. अष्टपैलु कामगिरी करणारा आसिफ शेख सामनावीर ठरला.
रोहीत पवार यांनी सृजन या अंतर्गत सुरु केलेले स्तुत्य असुन समाजाला दिशा देणारे आहेत, सामाजीक बांधीलकी जपताना रोहीत पवार सर्व घटकांना न्याय देत आहेत असे उद्गार सिनेअभिनेते रितेश देशमुख यांनी काढले. या अंतिम सामन्याला 9 हजार पेक्षा जास्त क्रिकेटप्रेमी पुणेकरांचा प्रतिसाद लाभला.
स्पर्धेतील विजेत्या पै. सचिन भाडळे प्रतिष्ठान वाघोली संघाला 5 लाख रुपये व करंडक तर उपविजेत्या आर्या स्पोर्ट संघाला 2 लाख 50 हजार रुपये व करंडक अशी पारितोषिके देण्यात आली.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्पर्धेचे आयोजक व पुणे जिल्हा परीषद सदस्य रोहित पवार, बॉलिवुडस्टार रितेश देशमुख,खा.सुप्रिया ताई सुळे,मा. विधानसभा अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील, आमदार डॉ.विश्वजीत कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लिजेंड्स क्रिकेट क्लबचे कैलास कोद्रे, मा.आमदार अशोक बाप्पू पवार, माजी आमदार बाप्पूसाहेब पठारे,प्रदेश उपाध्यक्ष रा.काँ.पार्टी सुरेश आण्णा घुले,प्रदेश उपाध्यक्ष रा.काँ.यु.अतुल बेनके,पुणे जि. म. स. बँक उपाध्यक्ष अर्चनाताई घारे, पुणे जि.प उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील ,जि. प.सदस्य अभिजित तंबीले,जि.प.सदस्य शंकर मांडेकर,जि. प.सदस्य मोहित ढमाले, नगरसेवक योगेश ससाणे,हाजिगफूर पठाण ,अशोक कांबळे, भैय्यासाहेब जाधव,हेमलताताई मगर,पूजा ताई कोद्रे, कॅन्टोनमेंटचे अध्यक्ष भोलासिंग अरोरा,फहिम शेख, हडपसरचे अध्यक्ष नारायण लोणकर,अतुल तरवडे, शिवाजीनगर अध्यक्ष निलेश निकम,अनिस सुंडके, रुपालीताई चाकणकर, मनाली भिलारे, मिलिंद बालवडकर, संदीप बालवडकर,कुणाल वेडेपाटील, निलेश नगर, संदिप कोद्रे,तेजस कोद्रे, धीरज जाधव,शैलेश लडकत, स्मिता लडकत, सुनील चांदेरे व अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट चे राजेंद्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे समालोचन नरेश ढोमे, ज्ञानेश्वर जगताप यांनी केले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- अंतिम फेरी
आर्या स्पोर्ट – 6 षटकात 2 बाद 47 धावा (बालाजी पवार नाबाद 19, वौभव पांडूले नाबाद 11, आसिफ शेख 1-4) पराभूत वि पै. सचिन भाडळे प्रतिष्ठान वाघोली – 3.5 षटकात बिनबाद 48 धावा(आसिफ शेख नाबाद 34, स्वप्निल सातव नाबाद 10) सामनावीर- आसिफ शेख