---Advertisement---

St. Petersburg Open: स्टॅन वावरिंकाने दुसऱ्या फेरीत केला प्रवेश

On: गुरूवार, ऑक्टोबर 15, 2020 7:41 AM
---Advertisement---

सेंट पीटर्सबर्ग| स्वित्झर्लंडचा टेनिसपटू स्टॅन वावरिंकाने सेंट पीटर्सबर्ग येथे डॅन इव्हान्सविरुद्ध झालेल्या सामन्यात तीन मॅच पॉईंट्स वाचवून सेंट पीटर्सबर्ग खुल्या टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. दुसर्‍या सेटमध्ये स्टॅन वावरिंका 5-6 गुणांसह सर्व्हिस करत असताना ब्रिटिश टेनिसपटू डॅन इव्हान्सकडे सामना जिंकण्यासाठी तीन संधी होत्या. तिन्ही प्रसंगी वावरिंका मॅच पॉईंट वाचविण्यात यशस्वी झाला आणि अखेर 3-6, 7-6, 7-5 ने सामना जिंकला.

2016 मध्ये स्टॅन वॉरिंकाने यूएस ओपन किताब जिंकला होता. त्या स्पर्धेतही इव्हान्स विरुद्ध झालेल्या सामन्यात स्टॅनने मॅच पॉईंट वाचवला होता. वावरिंकाचा पुढील सामना रशियन क्वालिफायर एव्हजेनी डोन्स्कोईशी होईल. ज्याने इगोर गेरासिमोव्हला 6-4, 7-6 ने पराभूत केले होते.

तथापि, आठव्या मानांकित टेलर फ्रिटझचा 6-6, 4-6, 6-3 ने पराभव करण्यात ब्रिटनचा कॅमेरून नॉरी यशस्वी झाला. अलेक्झांडर बुब्लिकने मॅकेन्झी मॅकडोनाल्डवर 2-6, 7-6, 6-6 असा विजय मिळवला. त्याचबरोबर जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या स्टीफानोस त्सित्सिपासने दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे.

नदालचा विक्रम मोडणे कठिण – अ‍ॅन्डी मरे

यापूर्वी राफेल नदालने रविवारी (11 ऑक्टोबर) जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाच्या नोवाक जोकोविचचा 6-0, 6-2, 7–5 ने पराभव करत पुरुष एकेरीच्या सामन्यातील 13 वा फ्रेंच ओपन किताब जिंकला होता.

ब्रिटीश टेनिसपटू अ‍ॅन्डी मरे म्हणाला की, “फ्रेंच ओपनमध्ये स्पेनच्या राफेल नदालचा विक्रम मोडणे कठीण आहे. ही एक मोठी कामगिरी आहे. फ्रेंच ओपनमध्ये नदाल आणखी किती पदके जिंकू शकेल हे मला माहित नाही. या सामन्यात विजय मिळवून 13 वा फ्रेंच ओपन किताब जिंकण्याचा विक्रम त्याने केला आहे आणि त्याचा विक्रम कोणी मोडेल असे मला वाटत नाही.”

महत्त्वाच्या बातम्या – 

राफेल नदालचे फ्रेंच ओपन जिंकणे झाले महाकठीण, राजस्थानचा फिरकीपटू देणार फाईट

फ्रेंच ओपन : स्पेनच्या राफेल नदालचे विक्रमी जेतेपद; राॅजर फेडररच्या विक्रमाशी बरोबर

अवघ्या १९व्या वर्षी इगा स्वीएटेकने जिंकली फ्रेंच ओपन

ट्रेंडिंग लेख –

मराठी मनाचा अभिमान.! नाव ‘तांबे’ पण खेळाडू मात्र सोन्यासारखा

गुळाचे व्यापारी असणाऱ्या कोल्हापूरच्या पाटलाचा मुलगा भारताकडून खेळला अवघा एकच सामना, पण…

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १७ – क्रिकेटचा गंभीर शिलेदार

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---