इंडियन प्रीमियर लीग 2024 ला 22 मार्चपासून सुरुवात होत आहे. आयपीएलचा हा 17 वा हंगाम आहे. त्यापूर्वी आयपीएलचे अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्सनं आगामी हंगामासाठी हिंदी आणि इंग्रजी टीव्ही कॉमेंट्री पॅनलची घोषणा केली.
समालोचन पॅनेलमध्ये सुनील गावसकर, ब्रायन लारा, हरभजन सिंग यांच्यासह अनेक माजी महान क्रिकेटपटूंचा समावेश आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथही समालोचन करताना दिसणार आहे. लिलावात त्याला कोणत्याही संघानं खरेदी केलं नव्हतं. याशिवाय इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडही कॉमेंट्री पॅनलमध्ये आहे. ब्रॉडनं गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
हिंदी कॉमेंट्री पॅनलमध्ये हरभजन सिंग, इरफान पठाण, सुनील गावसकर, रवी शास्त्री, इम्रान ताहिर, अंबाती रायडू, वरुण आरोन, मिताली राज, मोहम्मद कैफ, संजय मांजरेकर, वसीम जाफर, गुरकीरत मान, उन्मुक्त चंद, जतिन सप्रू, दीप दासगुप्त आणि रजत भाटिया, विवेक राजदान आणि रमन पद्मजीत यांचा समावेश आहे.
या पॅनेलमध्ये माजी भारतीय कर्णधार मिताली राज ही एकमेव महिला आहे. माजी क्रिकेटपटू वसीम जाफरनं नुकतीच पंजाब किंग्जपासून फारकत घेतली होती. तो पंजाब संघाशी फलंदाजी सल्लागार म्हणून जोडला होता. गावसकर, शास्त्री आणि दीप दासगुप्ता हिंदी व्यतिरिक्त इंग्रजीतही आपल्या आवाजाची जादू पसरवतील.
स्टार स्पोर्ट्सच्या इंग्रजी पॅनेलमध्ये स्टीव्ह स्मिथ, स्टुअर्ट ब्रॉड, डेल स्टेन, जॅक कॅलिस, टॉम मूडी, पॉल कॉलिंगवूड, सुनील गावसकर, ब्रायन लारा, रवी शास्त्री, मॅथ्थ्यू हेडन, केविन पीटरसन, मायकेल क्लार्क, संजय मांजरेकर, आरोन फिंच, इयान बिशप, नाइट, कॅटिच, मॉरिसन, बद्री, केटी, ग्रॅम स्वान, दीप दासगुप्ता, हर्षा भोगले, एमबींगवा, अंजुम चोप्रा, मुरली कार्तिक, रमण, रोहन गावसकर यांचा समावेश आहे.
22 मार्चला आयपीएलच्या 17 व्या हंगामातील पहिला सामना गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) यांच्यात होणार आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर दोघंही आमनेसामने येतील.
महत्त्वाच्या बातम्या-
“बीसीसीआयनं रणजी खेळाडूंच्या मानधनात तिप्पटीनं वाढ करावी”, सुनील गावसकर यांची मागणी
आयपीएलमध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या सहभागावर हरभजन सिंगचं मोठं वक्तव्य, म्हणाला…
एका यॉर्करनं बदललं ‘या’ 17 वर्षाच्या गोलंदाजाचं आयुष्य, खुद्द धोनीही झाला फॅन!