प्रतिष्ठित अशी कसोटी मालिका अर्थात ऍशेस मालिकेचे बिगुल वाजले असून ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात ब्रिसबेन येथे पहिल्या सामन्याला सुरुवातही झाली आहे. बुधवारी (०८ डिसेंबर) या सामन्याचा पहिला दिवस होता. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील प्रतिद्वंद्वाप्रमाणे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे खेळाडू ऍशेसमध्ये सामने खेळत असतात.
अशा या हाय व्होल्टेज मालिकेतील पहिल्याच सामन्याची सुरुवात अतिशय धमाकेदार राहिली. या सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर ऐतिहासिक विक्रम घडल्याचे पाहून सामना समालोचकांनी त्यांचे डोके धरले. या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
त्याचे झाले असे की, ब्रिसबेनमधील गाबाच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी निवडली. परंतु रूटचा हा निर्णय यजमान ऑस्ट्रेलियाच्या पथ्यावर पडला आणि त्यांनी अवघ्या १४७ धावांवर इंग्लंडचा संपूर्ण संघ पव्हेलियनला धाडला. त्यातही ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (Mitchell Starc) याने या सामन्यातील पहिल्याच चेंडूवर इंग्लंडच्या सलामीवीर रॉरी बर्न्स (Rory Burns) याच्या बत्त्या गुल केल्या.
WHAT A WAY TO START THE #ASHES! pic.twitter.com/XtaiJ3SKeV
— cricket.com.au (@cricketcomau) December 8, 2021
बर्न्सला स्टार्कच्या लेग स्टंपवर येणाऱ्या १४२ किमी दर ताशी चेडूचा अंदाज घेता आला नाही आणि त्याला काही कळायच्या आतच चेंडूने जाऊन यष्ट्या उडवल्या. अशाप्रकारे पहिल्याच चेंडूवर ऑस्ट्रेलियाला मोठे यश मिळाले आणि ८५ वर्षांच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदाच असा पराक्रम घडला. हे पाहून कॉमेंट्री बॉक्समध्ये समालोचन करत असलेले समालोचकही थक्क (Commentators Reaction) झाले.
पहिल्याच चेंडूवर विकेट पडल्याचे पाहून समालोचकही आश्चर्यचकित झाले आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये सर्वत्र गोंधळ सुरू झाला. यावेळी तिथे आलेला ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आरोन फिंचही चकित होऊन हे दृश्य पाहात होता.
"OHHHHH KNOCKED HIM OVER FIRST BALL!" Here's how we called Mitchell Starc's first ball of the 2021/22 Ashes 🤯 pic.twitter.com/QtRVyQnNmz
— Triple M Cricket (@triplemcricket) December 8, 2021
१९३६ मध्ये पहिल्यांदा बनला होता लाजिरवाणा विक्रम
ऍशेज मालिकेच्या पहिल्याच सामन्यातील पहिल्याच चेंडूवर फलंदाजाने बाद होण्याची ही केवळ दुसरीच वेळ आहे. यापूर्वी १९३६ मध्ये हा नकोसा विक्रम झाला होता. यावेळी ऑस्ट्रेलियन गोलंदाज एर्नी मैकॉर्मिक यांनी हा पराक्रम केला होता. त्यांनी इंग्लंडचे सलामीवीर स्टान वर्थिंग्टन यांना पहिल्याच चेंडूवर तंबूत धाडले होते. त्यावेळी स्टानचा झेल यष्टीरक्षक बेर्थ ओल्डफील्ड यांनी पकडला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
ऍशेस: कमिन्सचा पंजा अन् इंग्लंड ऑलआऊट; पहिल्या सामन्याच्या पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व