---Advertisement---

आता रणजी खेळाडू देखील होणार करारबद्ध? आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी माजी फलंदाजाचा सल्ला

On: गुरूवार, मे 27, 2021 4:36 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावसकर यांचा मुलगा असलेला, माजी क्रिकेटपटू रोहन गावसकर याने देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंचे हित लक्षात घेत राज्य क्रिकेट संघटनांकडे एक मागणी केली आहे. रोहन याने स्पष्ट केले की भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ज्याप्रमाणे भारतीय संघातील खेळाडूंसाठी वार्षिक करार करते, अगदी त्याच प्रमाणे राज्य क्रिकेट संघटनांनी देखील देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंसाठी वार्षिक कराराची सुरुवात केली पाहिजे. बीसीसीआयच्या वार्षिक कराराची रक्कम खूपच जास्त आहे, परंतु राज्य संघटनाही देशांतर्गत क्रिकेटपटूंसाठी आपल्या क्षमतेनुसार रक्कम निश्चित करू शकतात.

रोहन गावस्करने ट्विट केले की, “भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) भारतीय संघासाठी ज्याप्रमाणे वार्षिक करार करते, त्याप्रमाणे सर्व राज्य संघटनांनी देखील वार्षिक करार केले पाहिजेत. जर राज्य संघटना करार करणार नसतील, तर देशांतर्गत खेळाडू अशा परिस्थितीत आर्थिक अडचणीत येतील.” दरम्यान हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, बीसीसीआय आपल्या वार्षिक करारामध्ये भारतीय पुरुष संघातील खेळाडूंना चार प्रकाराच्या (ए प्लस, ए, बी, सी) विभागात मोडते. यामध्ये ए प्लस प्रकारातील खेळाडूंना एका वर्षासाठी इतर खेळाडूंपेक्षा अधिक जास्त रक्कम मिळते.

रोहन पुढे म्हणाला की, “वरिष्ठ खेळाडूला मधेच वगळता येऊ शकते का? तसेच यावर्षी पदार्पण करणाऱ्या युवा खेळाडूंचे काय? राज्य संघटनांनी त्यांच्या खेळाडूंचे हित बघणे गरजेचे आहे. कारण देशांतर्गत स्पर्धेत खेळणारे खेळाडूच क्रिकेटला यशस्वी बनवत असतात. त्यांची काळजी घेतली गेली पाहिजे. आणि त्यांच्यासाठी वार्षिक करार सुरू करायला हवा.”

कोरोनाच्या काळात देशांतर्गत स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंना प्रचंड आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की रोहन गावसकरच्या या मागणी संदर्भात राज्य क्रिकेट संघटना कोणत्या प्रकारचा निर्णय घेतात.

महत्वाच्या बातम्या-

विस्डेनने इंग्लंडविरुद्धच्या विश्व एकादशची केली घोषणा, भारतीय खेळाडूंचे संघात वर्चस्व

बांग्लादेशची गरुडभरारी! भारतासह दिग्गज संघांना पछाडत या क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान

रमेश पोवार यांच्यासोबतच्या वादाविषयी मितालीचे मोठे भाष्य, म्हणाली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---