पुणे | पु.ना. गाडगीळ यांच्या सौजन्याने आणि महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या मान्यतेने सोमणस् हेल्थ क्लब व पुणे जिल्हा अॅमॅच्युअर पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या वतीने राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे.
शनिवार, दिनांक १८ आणि रविवार दिनांक १९ आॅगस्ट रोजी डी.पी. रस्त्यावरील गोल्डन लीफ लॉन्स येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १८ आॅगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.
दिनांक २६ ते ३० सप्टेंबर दरम्यान लखनऊ येथे होणाºया राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार आहे. अशी माहिती पुणे जिल्हा अॅमॅच्युअर पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष राजहंस मेहेंदळे यांनी दिली.
स्पर्धेचे उद्घाटन पु.ना गाडगीळचे सौरभ गाडगीळ यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी रघुनाथ चितळे, इन्कम टॅक्स विभागाच्या अतिरीक्त आयुक्त एकता विश्नोई, महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे अध्यक्ष किशोर भोईर, सचिव संजय सरदेसाई, पुणे जिल्हा अॅमॅच्युअर पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सचिव अॅड. रविंद्र यादव उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण राज्यातून २५० पेक्षा अधिक स्पर्धक स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
राजहंस मेहेंदळे म्हणाले, पुरुष आणि महिलांच्या सबज्युनियर, ज्युनियर,सिनियर आणि मास्टर या गटात स्पर्धा होणार आहेत. महिला गटात ४३ ते ८५ किलो आणि त्यापुढील वजनी गटात तर पुरुष गटात ५९ किलोपासून १२० किलोच्या पुढील वजनीगटात स्पर्धा होणार आहेत.
स्ट्राँग वुमन आॅफ महाराष्ट्र आणि स्ट्राँग मॅन आॅफ महाराष्ट्र हे किताब देखील दिले जाणार आहेत. एकूण मिळालेली पदके आणि गुणांनुसार विजेत्या संघास ट्रॉफी देण्यात येईल.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या: