दिल्ली । उदयपासून भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना येथे सुरु होत आहे. भारताने मालिकेत १-० अशी आघडी घेतली आहे. उद्यापासून सुरु होणारा सामना जिंकून भारत मालिकेत २-० असा विजय मिळवण्यासाठी उत्सुक आहे.
तत्पूर्वी फिरोजशाह कोटला मैदानावरील काही विक्रम आपणास नक्की माहित हवे. ते विक्रम असे
– भारतीय संघ या मैदानावर १३ कसोटी सामने जिंकला आहे तर ६ सामने पराभूत झाला आहे. भारत या मैदानावर एकूण ३३ सामने खेळला असून त्यातील ११ ड्रॉ राहिले आहेत.
-भारतात केवळ चेन्नई येथील चिन्नास्वामी मैदानावर भारतीय संघ फिरोजशाह कोटला मैदनापेक्षा जास्त सामने जिंकला आहे. चेन्नई येथे भारतीय संघ ३३ पैकी १४ सामने जिंकला आहे.
-भारतीय संघ १९८८ नंतर येथे ११ कसोटी सामने खेळला असून त्यात १० सामन्यात संघाने विजय मिळवला आहे. तर एक सामना ड्रॉ राहिला आहे.
-भारतीय संघ १९८७ पर्यंत येथे २२ सामने खेळला होता त्यात केवळ ३ विजय तर ६ पराभव भारताला पाहावे लागले होते. १३ सामने ड्रॉ राहिले होते.
-आजपर्यंत या मैदानावर फिरकी गोलंदाजांनी ५०३ तर वेगवान गोलंदाजांनी ३६८ विकेट्स घेतल्या आहेत.
– या मैदानावर एका डावात सर्वाधिक धावा ८ बाद ६४४ विंडीजने भारताविरुद्ध १९५९ केल्या होत्या.
-१९८७ साली भारतीय संघ या मैदानावर ७५ धावांत बाद झाला होता. ही या मैदानावरील कसोटी डावातील नीचांकी धावसंख्या आहे.





टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये रंगणार दिग्गजांची मैफल! विश्वचषकासाठी ‘स्टार’ कॉमेंट्री पॅनेलची घोषणा