भारताची स्टार महिला खेळाडू स्म्रीती मानधनाचा (Smriti Mandhana) आज गुरुवार (18 जुलै) रोजी 28वा वाढदिवस आहे. 18 जुलै 1996 ला मुंबईमध्ये मानधनाचा जन्म झाला होता. तिच्या वडिलांचे नाव श्रीनिवास मानधना तर आईचे नाव स्मिता मानधना आहे. मानधनाच्या जन्मदिनादिवशी आज आपण तिची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकीर्द पाहणार आहोत.
मानधनाला 5 एप्रिल 2013 रोजी बांगलादेश महिला संघाविरुद्धच्या टी20 मालिकेत भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली. पहिल्या सामन्यात तिने 36 चेंडूत 39 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. यादरम्यान तिनं 4 उत्कृष्ट चौकार मारले. स्म्रीती मानधना 11 वर्षांची होती, तेव्हा तिची 19 वर्षाखालील संघात निवड झाली होती. तिनं ऑक्टोबर 2013 मध्ये गुजरातविरुद्ध 150 चेंडूत नाबाद 224 धावांची विस्फोटक खेळी खेळली होती.
स्म्रीती मानधनानं (Smriti Mandhana) 2016 मध्ये तिचं पहिलं एकदिवसीय शतक झळकावलं होतं. तेव्हा तिनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध होबार्टमध्ये 109 चेंडूत 102 धावा केल्या होत्या. तर जवळपास 5 वर्षानंतर मानधनानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध पिंक बाॅल कसोटी क्रिकेटमध्ये 216 चेंडूत शानदार शतक झळकावलं होतं. त्यामध्ये तिनं 22 चौकार तर 1 षटकार लगावला होता.
स्म्रीती मानधनानं आतापर्यंत 7 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये तिनं 12 डावात 57.18च्या सरासरीनं 629 धावा केल्या आहेत. यादरम्यानं तिनं 3 अर्धशतकांसह 2 शतक ठोकले आहेत. त्यामध्ये तिची सर्वोच्च धावसंख्या 149 राहिली आहे. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 85 सामन्यांमध्ये 85.07च्या स्ट्राईक रेटनं 3,585 धावा ठोकल्या आहेत. 85 सामन्यांमध्ये तिनं 27 अर्धशतक तर 7 शतक ठोकले आहेत. त्यामध्ये तिची सर्वोच्च धावसंख्या 136 आहे.
मानधनानं 136 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आतापर्यंत 3,320 धावा केल्या आहेत. त्यामध्ये तिनं 24 अर्धशतक ठोकले आहेत. यादरम्यानं तिची फलंदाजी सरासरी 28.13 राहिली आहे. तर तिचा स्ट्राईक रेट 121.13 आहे. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये तिची सर्वोच्च धावसंख्या 87 आहे. मानधनानं भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत सात हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बुमराह हा किर्तीमान रचणाच्या उंबरठ्यावर, श्रीलंका दाैऱ्यासाठी मिळणार संधी?
टी20 कर्णधारावरून वाद, जय शाह आणि गौतम गंभीरमध्ये बिनसलं?
आगामी श्रीलंकेदाैऱ्यापूर्वी केएल राहुल चर्चेत! मुंबईमध्ये खरेदी केले चक्क इतक्या किमतीचे घर