भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा टी२० सामना भारताने ७ विकेट्सने जिंकत तीन सामन्यांची मालिका २-१ने जिंकली.
रोहित शर्माच्या खणखणीत शतकाच्या जोरावर तसेच कर्णधार कोहलीने त्याला दिलेल्या ४३ धावांच्या पाठबळामुळे भारताने १९व्या षटकातील चौथ्या चेंडूवरच विजय मिळवला.
या सामन्यातील काही खास विक्रम-
-एकाच टी२० सामन्यात ३०धावा आणि ४ विकेट्स घेणारा हार्दिक पंड्या जगातील ७वा तर भारतातील पहिलाच खेळाडू
-क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात कमीतकमी ३ शतके करणारा रोहित शर्मा जगातील पहिलाच खेळाडू
-भारतीय संघ सलग ६ टी२० मालिका जिंकला आहे. सलग ९ मालिका जिंकत पाकिस्तान या यादीत अव्वल स्थानी
-भारताबाहेर टीम इंडियाने पहिल्यांदाच एवढे मोठे लक्ष पार केले आहे.
-सर्व प्रकारच्या टी२०मध्ये रोहित शर्माने ५ शतके केली आहे. अाशिया खंडातील कोणत्याही खेळाडूला अशी कामगिरी करता आली नाही.
-तीन टी२० सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ कधीही तिसरा सामना पराभूत झाला नाही.
-आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात ३ शतके करणारा रोहित जगातील दुसरा खेळाडू. यापुर्वी काॅलिन मुर्नोने हा पराक्रम केला आहे.
-आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीत २००० धावा करणारा रोहित शर्मा दुसरा भारतीय तर जगातील ५वा खेळाडू
-आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात एकाच सामन्यात ५ झेल घेणारा धोनी जगातील पहिला यष्टीरक्षक
-आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीत यष्टीमागे ५० झेल घेणारा धोनी पहिलाच यष्टीरक्षक